शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आज मांडणार ‘एक देश, एक निवडणूक’; लोकसभेत विधेयक सादर होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 05:57 IST

हे विधेयक मांडले गेल्यावर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठविले जाऊ शकते.

चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक लोकसभेत सोमवारी मांडले जाऊ शकले नाही. ऐनवेळी विषयतालिकेतून हा विषय काढून टाकण्यात आला. विधेयक आता कधी मांडले जाईल हे सरकारने स्पष्ट केले नसले, तरी आज मंगळवारी ते मांडले जाण्याची शक्यता आहे.

हे विधेयक मांडले गेल्यावर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठविले जाऊ शकते. राज्यघटनेतील १२९व्या दुरुस्तीचे हे विधेयक कायदा मंत्री राम मेघवाल लोकसभेत मांडतील, अशी शक्यता आहे. विविध पक्षांच्या सदस्य संख्येनुसार संयुक्त समिती नेमली जाईल. समितीचे अध्यक्षपद भाजपकडे असेल. याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार हे विधेयक मांडले जात आहे. देशभर लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १२ डिसेंबर रोजी या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली होती. 

‘राज्यसभेत सचिनची सेंच्युरी!’

राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचे लक्ष वेधून घेताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सचिन तेंडुलकरच्या सेंच्युरीचा उल्लेख केला. सभापतींना उद्देशून खरगे म्हणाले, ‘आपण माझ्याकडे पाहत नाहीत आणि ऐकतही नाहीत.’ 

यावर अध्यक्ष धनखड स्मितहास्य करत म्हणाले, ‘९९ टक्के मी तुम्हालाच पाहत आहे.’ खरगे म्हणाले, ‘पण हा १ टक्का खूप महत्त्वाचा आहे. सचिन तेंडुलकरने १० किंवा १२ वेळा ९९ धावा केल्या पण शतक करू शकला नाही. म्हणूनच मी विनंती करतो कारण हा विषय खूप महत्त्वाचा आहे.’ 

तर, काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाचा उपयोग घटनेची निर्मिती करण्यासाठी केला. मात्र, सत्ताधारी पक्ष देशवासीयांची दिशाभूल करीत आहे, असे मुकुल वासनिक म्हणाले.

भारताचे संविधान जगात सर्वोत्तम : पटेल

जगाला हेवा वाटावा, असे भारताचे संविधान असून याचा आपण सर्वांना अभिमान हवा, असे प्रतिपादन अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत बोलताना केले. अमेरिकेत कृष्णवर्णीय महिलांना साठच्या दशकात मतदानाचा अधिकार देण्यात आला. याउलट भारताने घटना स्वीकारली तेव्हापासूनच महिलांना मतदानाचा अधिकार दिला, असे पटेल यांनी सांगितले. 

एका परिवारासाठी काँग्रेसने केल्या घटनादुरुस्त्या : अर्थमंत्री

काँग्रेसने एका परिवाराला व त्यांच्या राजवटीला मदत करण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्त्या केल्या, असा आरोप केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी राज्यसभेत केला.  काँग्रेस पक्ष महिलाविरोधी आहे. महिलांना राखीव जागा देण्यासंदर्भातील विधेयक काँग्रेस सत्तेवर असताना मंजूर झाले नाही. काँग्रेस सरकारांच्या आर्थिक धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली नाही, असे त्या म्हणाल्या. 

 

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनParliamentसंसदlok sabhaलोकसभाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी