शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ताशी १८० किमी वेगाने धावली विनाइंजिन ‘ट्रेन-१८’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 04:46 IST

‘इंटेग्रल कोच फॅक्टरी’ने (आयएफसी) उत्पादित केलेल्या ‘ट्रेन १८’ या भारतातील पहिल्या विनाइंजिनच्या रेल्वेगाडीने ताशी १८० किमीहून अधिक वेगाने धावण्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

नवी दिल्ली : ‘इंटेग्रल कोच फॅक्टरी’ने (आयएफसी) उत्पादित केलेल्या ‘ट्रेन १८’ या भारतातील पहिल्या विनाइंजिनच्या रेल्वेगाडीने ताशी १८० किमीहून अधिक वेगाने धावण्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही गाडी प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेच्या सेवेत रुजू झाल्यावर ती देशातील सर्वात वेगवान रेल्वेगाडी ठरेल. ताशी १६० किमी वेगाने धावणारी ‘गतिमान’ ही देशातील सर्वात वेगवान रेल्वे आहे.‘आयएफसी’चे महाव्यवस्थापक एस. मणी यांनी सांगितले की, राजस्थानात कोटा-सवाई माधोपूर मार्गावर घेतलेल्या चाचणीत ‘ट्रेन-१८’ने ताशी १८० किमी वेगाची मर्यादा पार केली. आणखी चाचण्या झाल्यावर या गाडीचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर सुरू होईल. अशा चाचण्यांना तीन महिने लागतात; परंतु ‘ट्रेन-१८’च्या चाचण्या तुलनेने वेगाने पूर्ण झाल्या. या गाडीच्या व्यापारी सेवा जानेवारीपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. रूळ व सिग्नल यंत्रणाही अनुरूप असेल, तर ही गाडी ताशी २०० किमीचा वेगही गाठू शकेल. ‘आयएफसी’ने ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत या अत्याधुनिक रेल्वेगाडीचे उत्पादन केले आहे. गाडीचा उत्पादन खर्च १०० कोटी रुपये आहे.> गुणवैशिष्ट्ये१६ डब्यांच्या गाडीची प्रवासीक्षमता ‘शताब्दी एक्स्प्रेस’एवढी.‘शताब्दी’च्या तुलनेत प्रवासाचा वेळ १५ टक्के कमी.‘सेमी हाय स्पीड’ गाडी पूर्णपणे वातानुकूलित.वेगळे इंजिन नाही. ‘इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिटस्’ (ईएमयू) तंत्रज्ञानावर आधारित.इंधनाचीही मोठी बचत.मुंबईसह अन्य काही शहरांमध्ये उपनगरी लोकल गाड्या अशाच ‘ईएमयू’ तंत्रज्ञानावर चालणाऱ्या असतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हे तंत्रज्ञान प्रथमच उपयोगात आणले जात आहे.