शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अनंत आमुची ध्येयासक्ती! लवकरच पुन्हा विमान उडवायचंय; अभिनंदन यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 20:34 IST

विंग कमांडर अभिनंदन यांना पुन्हा खुणावतंय आकाश

नवी दिल्ली: पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 विमान जमीनदोस्त करणारे, जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन यांची आकाशाची ओढ कायम आहे. पाकिस्तानी सैन्याला कोणतीही माहिती न देणाऱ्या अभिनंदन यांनी पुन्हा एकदा कॉकपिटमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली. मला लवकरच विमान उडवायचं आहे, अशी भावना अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. नवी दिल्लीतल्या सैन्याच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात अभिनंदन यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि वरिष्ठ कमांडोंनी अभिनंदन यांची भेट घेतली. यानंतर वरिष्ठ कमांडो आणि डॉक्टरांकडे अभिनंदन यांनी लवकरात लवकर विमान उड्डाण करण्याची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तानी हवाई दलाविरुद्ध संघर्ष सुरू असताना अभिनंदन यांनी एफ-16 हे अत्याधुनिक विमान जमीनदोस्त केलं. अभिनंदन हे एफ-16 विमान पाडणारे भारतीय हवाई दलाचे पहिले वैमानिक आहेत. 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या कचाट्यात सापडलेल्या अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारत सरकारनं पाकिस्तानवर जगभरातून दबाव आणला. यानंतर 1 मार्चला अभिनंदन यांची सुटका झाली. वाघा बॉर्डरवरुन ते मायदेशी परतले. त्यावेळी त्यांचं एखाद्या नायकाप्रमाणे जल्लोषात स्वागत झालं. यानंतर त्यांना उपचारांसाठी सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांची काळजी घेत आहे. अभिनंदन लवकर कॉकपिटमध्ये परतावेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. अभिनंदन यांचं मिग 21 विमान कोसळल्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांच्या हाती लागले. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतलं. मात्र त्याआधी अभिनंदन यांनी मोठ्या शिताफीनं त्यांच्याकडे असणारी गोपनीय कागदपत्रं नष्ट केली. पाकिस्तानी सैन्यानं अभिनंदन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्यांनी कोणतीही गोपनीय माहिती सांगितली नाही. एफ-16 विमान पाडणाऱ्या आणि जवळपास 58 तास पाकिस्तानच्या ताब्यात असताना कोणतीही गोपनीय माहिती न देणाऱ्या अभिनंदन यांच्या कामगिरीची चर्चा सध्या देशात सर्वत्र सुरू आहे. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान