शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात प्रचंड मानसिक छळ झाला- अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 19:18 IST

अभिनंदन यांनी हवाई दलातील वरिष्ठांना दिली माहिती

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यात असताना प्रचंड मानसिक छळ करण्यात आल्याची माहिती विंग कमांडर अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना दिली. पाकिस्ताननं शारीरिक छळ केलेला नसला, तरी प्रचंड मानसिक वेदना दिल्याचं अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं. अभिनंदन वर्धमान जवळपास 58 तास पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांना 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं. अभिनंदन यांचं मिग 21 विमान पाकिस्तानच्या हवाई दलाच्या कारवाईला प्रत्युत्तर देताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं. मात्र याआधी अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील एफ-16 विमान पाडलं. पाकिस्तानची विमानं भारतीय हवाई हद्दीत घुसल्यानंतर भारतीय हवाई दलानं प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. पाकिस्तानची विमानं भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ले करण्याच्या प्रयत्नान असताना भारतीय हवाई दलानं त्यांना माघार घेण्यास भाग पाडलं. मिग-21 विमान कोसळण्याआधी वर्धमान यांनी पाकिस्तानचं एफ-16 विमानं जमीनदोस्त केलं. त्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले. तिथे काही स्थानिकांनी त्यांना मारहाण केली. यानंतर दोन पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र त्याआधी अभिनंदन यांनी मोठ्या शिताफीनं त्यांच्याकडे असणारी गोपनीय कागदपत्रं नष्ट केली. 58 तास पाकिस्तानच्या ताब्यात असलेले अभिनंदन काल रात्री वाघा बॉर्डरवरुन मायदेशी परतले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 28 फेब्रुवारीला अभिनंदन यांची सुटका केली जाणार असल्याची घोषणा संसदेत केली होती. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तान