शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या बसमध्ये महिला कर्मचा-यांना नेमणार? सुप्रीम कोर्टाच्या नोटीसनंतर विचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:44 IST

शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाºया बसेससाठी केवळ महिला कर्मचा-यांच्याच नेमणुका करता येतील काय, याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस दिल्यानंतर, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणा-या बसेससाठी केवळ महिला कर्मचाºयांच्याच नेमणुका करता येतील काय, याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस दिल्यानंतर, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.गुरगावच्या रायन इंटरनॅशनल शाळेतील सात वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची गळा कापून हत्या झाल्याच्या संतापजनक प्रकाराचे दिल्ली व परिसरात जोरदार पडसाद उमटले आहेत. शाळेत जाणा-या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. पालकांचा संताप अद्याप ओसरलेला नाही. संतापलेल्या जमावाने रविवारी शाळेजवळचे दारू दुकान पेटवून दिल्यानंतर, पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्या प्रकरणी दोन पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे.दिल्लीच्या जंतरमंतरवर, तसेच नॉयडा रायन इंटरनॅशनलच्या शाळेसमोरही पालकांनी या घटनेच्या विरोधात निदर्शने केली. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली असून, केंद्र सरकारला नोटीस पाठविली आहे. या विषयावर जावडेकर म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सरकारला चिंता आहे. कोर्टाच्या नाटिशीचे आम्ही सविस्तर उत्तर देणार आहोत. मात्र, सर्व संबंधितांशी चर्चा करून, या समस्येतून कसा मार्ग काढता येईल, याचा निर्णयही त्यानंतरच घेतला जाईल.प्रद्युम्नच्य हत्येप्रकरणी पोलिसांनी अशोक नावाच्या कंडक्टरला अटक केली आहे. मात्र, ज्या दिशेने पोलीस तपास सुरू आहे, त्यावर बसचालकासह अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. शाळेची मान्यता रद्द करणार नाही. मात्र, ज्युवेनाइल जस्टिस कायद्यानुसार शाळेवर कारवाई केली जाईल, असे हरयाणा सरकारने जाहीर केले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, शाळेचे व्यवस्थापन व मालकाचे नावही एफआयआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.सीबीआय चौकशीला तयारीपोलीस तपासाबाबत मुलाच्या पालकांचे समाधान होत नसेल, तर सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची सरकारची तयारी आहे, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सोमवारी सांगितले.

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलSchoolशाळाGovernmentसरकार