शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यापर्यंत तरी हिवाळी अधिवेशन होणार काय ?, प्रकाश राज यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 14:03 IST

नवी दिल्ली- नोटाबंदी, जातीयवाद आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका करणा-या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे.

नवी दिल्ली- नोटाबंदी, जातीयवाद आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका करणा-या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे. उन्हाळ्यापर्यंत तरी हिवाळी अधिवेशन होणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित करत भाजपावर निशाणा साधला आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतं. परंतु यंदा अद्यापही अधिवेशन झालेलं नाही. अधिवेशन बोलावण्यास होणाऱ्या दिरंगाईबद्दल प्रकाश राज यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.अजून थंडी पडलेली नाही काय?, मग हिवाळी अधिवेशन का बोलावलं नाही, तुम्ही दुसरीकडे कुठं व्यस्त आहात का? निवडणुकीआधी उत्तर देणं तुम्हाला लाजिरवाणं वाटतंय का', असे सवाल प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावरील वारंवार होणा-या टीकेला उत्तर देण्यासाठी ‘जस्ट आस्किंग’, असं हॅशटॅग करत टीकाकारांनाही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘जस्ट आस्किंग’च्या माध्यमातून प्रकाश राज हे मोदी सरकारला नेहमीच अनेक प्रश्न विचारत असतात. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही त्यांनी मोदी सरकारवर टि्वटरवरून टीका केली होती.गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत मौन बाळगणारे मोदी हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते आहेत. त्यामुळे माझे राष्ट्रीय पुरस्कार हे त्यांनाच देण्यात यावेत, असंही ते म्हणाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. देशात घडणाऱ्या चुकीच्या घटनांविरोधात आवाज उठवल्यानंतर आपला आवाज दाबण्याचं काम हे ट्रोल्स करतात. पण आपण न घाबरता जे योग्य आहे ते बोलत राहिलं पाहिजे, असं मत त्यानं एकदा मांडलं आहे. 

 

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा