शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

यूजीसीही मोडीत काढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 07:29 IST

गेली सहा दशके असलेला विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मोडीत काढून, उच्च शिक्षणाचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी नवी राष्ट्रीय नियामक संस्था स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

नवी दिल्ली : गेली सहा दशके असलेला विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मोडीत काढून, उच्च शिक्षणाचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी नवी राष्ट्रीय नियामक संस्था स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. ही संस्था फक्त शैक्षणिक बाबींवर लक्ष केंद्रित करेल व विद्यापीठांना अनुदान देण्याचे काम सरकार करेल.नव्या नियामक संस्थेचे नाव ‘भारतीय राष्ट्रीय उच्चशिक्षण नियामक आयोग’ असे असेल. यूजीसीचा गाशा गुंडाळून हा आयोग स्थापन करण्यासाठी विधेयकाचा मसुदा केंद्रीय मनुष्यबळ विकास आयोगाने तयार केला आहे. तो मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध असून, संबंधितांनी ७ जुलैपर्यंत त्यावर मते व अभिप्राय पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. हे विधेयक पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.आधी उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण व शिक्षक प्रशिक्षण यासाठी एकच नियामक स्थापण्याचा विचार होता. त्यामुळे ‘यूजीसी’, ‘एआयसीटीई’ व ‘एनसीटीई’ इतिहासजमा झाल्या असत्या. मात्र, त्याऐवजी उच्चशिक्षणासाठी स्वतंत्र व व्यापक अधिकारांचा नियामक नेमून या क्षेत्रास गुणात्मक बळकटी देण्याचे ठरले.प्रस्तावित कायद्यानुसार, उच्चशिक्षणाचा गुणात्मक दर्जाचे मापदंड ठरवून त्यांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार नव्या संस्थेस प्रथम दिले जातील. नवा आयोग हलक्या व बनावट शैक्षणिक संस्था सक्तीने बंद करू शकेल. आयोगाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या संस्थांना दंड आकारण्याखेरीज त्यांच्या संचालकांना तुरुंगात धाडण्याचीही तरतूद त्यात असेल. ‘यूजीसी’ हे करू शकत नसे.हा बदल करण्याची आवश्यकता विषद करताना सूत्रांनी सांगितले की, सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाचा बहुतांश वेळ व शक्ती संस्थांना अनुदान देण्याच्या कामांवरच खर्च होतो. त्यामुळे उच्चशिक्षणाचा दर्जा उंचावणे, त्यानुसार अभ्यासक्रम व मापदंड ठरविणे आणि त्यासाठी दर्जेदार शैक्षणिक संस्थांचे जाळे तयार करणे, यासारख्या मूलगामी कामांकडे लक्ष देता येत नाही. नव्या व्यवस्थेत या त्रुटी दूर होतील.अशी असेल कार्यकक्षाउच्च शिक्षणाचे दर्जात्मक मापदंड ठरविणे.अध्यापनाचा गुणात्मक दर्जा ठरविणे.नव्या शैक्षणिक संस्था सुरू करणे, चालू संस्था बंद करण्याचे निकष ठरविणे.शैक्षणिक संस्थांचे वार्षिक मूल्यमापन करून त्यांची प्रतवारी करणे.पुस्तकी ज्ञानावर भर न देता संशोधनास प्रोत्साहन देणे.चुकार संस्थांवर कारवाई करणे