शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल सत्य: दोन हजार रुपयांची नोट बंद होणार? रिझर्व्ह बँक म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 14:59 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत सुरुवातीपासून उलटसुलट चर्चा होत असते.

नवी दिल्ली  - नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत सुरुवातीपासून उलटसुलट चर्चा सुरू असते. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात येणार असल्याने अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्याचा दावा या मेसेजमधून करण्यात येत आहे. मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या स्पष्टीकरणानंतरी हे खोटे मेसेज व्हायरल होत आहेत. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर चलनात आलेली दोन हजार रुपयांची नोट सुरुवातीपासूनच अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. तसेच या नोटीबाबत अनेकदा अफवाही पसरत असतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द होण्याचा संबंध अनेकजण दोन हजार रुपयांची नोट आणि काश्मीरशी जोडत आहेत. काश्मीर प्रश्नामुळे दोन हजार रुपयांची नोट रद्द करण्यात येत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. तसेच मेसेजला आधार म्हणून एसआयटीने सरकारला केलेल्या काही शिफारशींचा उल्लेख असलेली चित्रफीत शेअर केली जात आहे. 

  बँक आणि पैशांशी संबंध असल्याने हा मेसेज मोठ्या प्रमाणावर शेअर झाला आहे. व्हॉट्सअॅपवरूनही हा मेजेस अनेकांकडे शेअर होत आहे.  मात्र रिझर्व्ह बँकेने हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले आहे. तसेच अशा प्रकारचा कुठलाही मेसेज शेअर केल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे.   

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकViral Photosव्हायरल फोटोज्Indiaभारत