शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पदवी घेतल्यानंतर तरुणांना १ लाख कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देणार : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 09:43 IST

बांसवाडा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस युवकांसाठी पाच ऐतिहासिक कामे करणार आहेत.

जयपूर : केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास तरुणांना ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. प्रत्येक पदवी आणि पदविकाधारक तरुणांना सरकारी किंवा खासगी कंपनीत एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण (अप्रेंटिसशिप) दिले जाईल. त्यासाठी त्याला एका वर्षात १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बांसवाडा येथे केली. 

  बांसवाडा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर काँग्रेस युवकांसाठी पाच ऐतिहासिक कामे करणार आहेत. ज्यात भरतीची हमी, पहिल्या नोकरीची हमी, पेपरफुटीपासून मुक्तता, ‘गिग इकॉनॉमी’त सामाजिक सुरक्षा आणि ‘युवा रोशनी’ यांचा समावेश राहील.

  आम्ही देशातील सर्व तरुणांना शिकाऊ शिक्षणाचा अधिकार देणार आहोत. त्यासाठी वर्षभरात त्याला १ लाख रुपये विद्यावेतन दिले जाईल. हा मनरेगासारखा हक्क असेल. याचा फायदा कोट्यवधी तरुणांना होणार आहे. त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि एकप्रकारे त्यांना पहिल्या वर्षीच रोजगार मिळेल.

‘गिग वर्कर्स’साठी सुरक्षा कायदाओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन इत्यादी कंपन्यांसाठी चालक, सुरक्षारक्षक आणि प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या ‘गिग वर्कर्स’साठी सामाजिक सुरक्षा कायदा आणण्याची घोषणाही गांधींनी केली.राजस्थानमधील यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने असा कायदा केला होता. हाच कायदा आम्ही संपूर्ण देशात लागू करू, असेही ते म्हणाले. याशिवाय त्यांनी ‘युवा रोशनी’ योजनेची घोषणा केली. ज्याअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांना पाच हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी दिला जाईल. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही जाहीर सभेला संबोधित केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस