शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘हिट ॲण्ड रन’ची भरपाई दरवर्षी वाढविणार? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 07:06 IST

सरकारला आठ आठवड्यांत यावर योग्य निर्णय घेण्यास सांगून न्यायालयाने २२ एप्रिलला पुढील सुनावणी ठेवली. 

नवी दिल्ली : ‘हिट ॲण्ड रन’ अपघातात मृत्यू वा गंभीर दुखापतीबद्दल देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कम दरवर्षी वाढवता येईल का, याबाबत विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. सरकारला आठ आठवड्यांत यावर योग्य निर्णय घेण्यास सांगून न्यायालयाने २२ एप्रिलला पुढील सुनावणी ठेवली. 

‘हिट ॲण्ड रन’ (अपघाताला कारणीभूत वाहनचालक पळून गेल्यामुळे त्याचा शोध न लागणे) अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये किंवा सरकारने विहीत केलेली त्याहून अधिकची रक्कम आणि गंभीर दुखापतीबद्दल ५० हजार रुपयांची भरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र, त्याबाबत माहिती नसल्यामुळे भरपाईच्या दाव्यांचे प्रमाण नगण्य आहे. यावर नाराजी व्यक्त करत नुकसानभरपाई योजनेची पीडित व त्याच्या कुटुंबीयांना माहिती देणे हे पोलिसांचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

२०१६ मध्ये ५५,९४२ ‘हिट अँड रन’ अपघातांची नोंद झाली होती, तर २०२२ मध्ये हा आकडा ६७,३८७ वर पोहोचला, असे सांगत न्यायमूर्ती ए. एस. ओका आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या खंडपीठाने ‘हिट अँड रन’ अपघातांच्या वाढत्या संख्येकडे लक्ष वेधले.

अपघातांच्या तुलनेत भरपाई मात्र नगण्यगेल्या पाच वर्षांत हिट अँड रन अपघातात ६६० जणांचा मृत्यू तर ११३ जणांना गंभीर दुखापत झाली होती. त्यातील पीडितांना १८४.६० लाख रुपयांची भरपाई वितरित करण्यात आली, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांनी गेल्या वर्षी लोकसभेत सांगितले होते. नोंदविल्या गेलेले हिट अँड रन अपघात आणि नुकसान भरपाई मागणाऱ्यांच्या संख्येची तुलना केली तर, नगण्य संख्येने पीडितांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसते, असे सांगत खंडपीठाने नुकसान भरपाई योजनेची माहिती पीडितांना नसणे हेही भरपाईचे दावे न करण्याचे एक कारण असू शकते, असे म्हटले. काळानुसार पैशाचे मूल्य कमी होत जाते. भरपाईची रक्कम दरवर्षी हळूहळू वाढवता येईल का यावर विचार करण्याचे निर्देश केंद्र सरकारला देतो. केंद्र आठ आठवड्यांच्या आत या विषयावर योग्य निर्णय घेईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सध्या किती आहे तरतूद?अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास     २,००,००० रु. सरकारने विहीत केलेली त्याहून अधिकची रक्कम गंभीर दुखापतीबद्दल     ५०,००० रुपयांची 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय