शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पहिलेच अधिवेशन ठरणार वादळी ? लोकसभा उपाध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 09:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर १८व्या लोकसभेचे पहिले सत्र सोमवार २४ जूनपासून सुरू होणार आहे.

हरीश गुप्ता

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर १८व्या लोकसभेचे पहिले सत्र सोमवार २४ जूनपासून सुरू होणार आहे. मोदी ३.० कार्यकाळातील हे पहिले अधिवेशन राहणार असून त्यात नव्या सदस्यांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी होण्याची शक्यता आहे. 'नीट' परीक्षेमधील घोळ, १५ राज्यांमध्ये ४१ वेळा झालेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे सरकार बॅकफूटवर आले आहे. नवसंजीवनी मिळालेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी असून लोकसभेचे पहिलेच अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

५८ मंत्र्यांनाही देणार शपथमोदी सरकारमधील ५८ मंत्री लोकसभेचे सदस्य आहे. त्यांनाही लोकसभाध्यक्ष शपथ देतील. २७ जून रोजी राष्ट्रपतींचे अभिभाषण होणार आहे. १ ते ३ जुलै या काळात दोन्ही सभागृहांमध्ये त्यावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होईल. गेल्या कार्यकाळात हकालपट्टी झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे पुनरागमन होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

या मुद्द्यांवरून वादळ३ जुलैपर्यंत अधिवेशन चालणार असून गेल्या १० वर्षांमध्ये प्रथमच मोदी सरकारसमोर मजबूत विरोधी पक्ष राहणार आहेत. नीट परीक्षेतील गोंधळ, लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील घडामोडी इत्यादी मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होऊ शकतात.मणिपूरमधील हिंसाचार, बेरोजगारी, महागाई तसेच दोन मुख्यमंत्र्यांना अटक या मुद्द्यांवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

अध्यक्षांची निवड कधी?२६ जूनला अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. जदयू आणि तेदेपा यांनाही या पदावर दावा केला आहे. मात्र, त्यांना उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते. 'इंडिया' आघाडीने उपाध्यक्षपद मागितले आहे. ते न मिळाल्यास अध्यक्षपदासाठी उमेदवार उतरविला जाऊ शकतो.

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी