शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांच्याबाबत सोनिया गांधी निर्णय घेणार? चार दिवसांत काँग्रेस नेत्यांची तीन वेळा बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 08:32 IST

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची काँग्रेस पक्षात नेमकी काय भूमिका राहील, या संदर्भात काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा ...

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची काँग्रेस पक्षात नेमकी काय भूमिका राहील, या संदर्भात काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा पूर्णत्वाच्या मार्गावर असून, आता यावर अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी घेणार आहेत, हे स्पष्ट झालेआहे.गेल्या शनिवारपासून प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी व काँग्रेस नेत्यांशी तीन वेळा चर्चा केली. २०२४ मध्ये काँग्रेसची रणनीती कशी राहावी व कोणत्या मतदारसंघांवर काँग्रेसने भर द्यावा, यावर शनिवारी त्यांनी विस्तृत प्रेझेन्टेशन दिले होते. प्रशांत किशोर यांनी केलेल्या सादरीकरणावर बहुतेक काँग्रेस नेत्यांनी सहमती दर्शविलीआहे. प्रशांत किशोर यांची काँग्रेसमध्ये नेमकी काय भूमिका राहील, यावर खरा पेच आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये सामील व्हावे, हा काँग्रेस नेत्यांचा प्रस्ताव आहे. कारण प्रशांत किशोर टीआरएस (तेलंगणा), वायएसआरसीपी (आंध्रप्रदेश), टीएमसी (पश्चिम बंगाल) या पक्षांसोबत काम करीत आहेत. या राज्यांमध्ये काँग्रेसची या पक्षांशी थेट लढत आहे. काँग्रेसमध्ये सामील झाल्यास प्रशांत किशोर काय भूमिकेत राहतील, यावर निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना दिल्याचे समजते. प्रशांत किशोर यांची अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा झाली. मंगळवारी झालेल्या चर्चेच्या वेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह सामील झाले होते.

२ मेपूर्वी अंतिम निर्णय --    प्रशांत किशोर यांनी २ मेपूर्वी निर्णय जाहीर करू, असे स्पष्ट केले आहे. यामुळे २ मेपूर्वी काँग्रेस पक्षाला निर्णय घ्यावा लागेल.राहुल गांधी विदेशात-    काँग्रेसचे नेते राहुल गांधी मंगळवारी झालेल्या बैठकीला अनुपस्थित होते. ते विदेशात गेले आहेत.-    प्रशांत किशोर यांच्या प्रेझेन्टेशनला त्यांनी सहमती दर्शविली असल्याचे समजते.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीPrashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेस