शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'हे' मंदिर भाजपाला फळणार? लोकसभा निवडणुकीत दक्षिणद्वार उघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 14:02 IST

उत्तरेतील रामबाणानंतर आता दक्षिणेतील विस्तारासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू

तिरुअनंतपुरम: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीत लाभदायक ठरू शकतील, अशी समीकरणं जुळवण्यासाठी पक्षांच्या थिंक टँक कामाला लागल्या आहेत. भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केरळमध्ये तीन-चार मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. सबरीमाला कर्म समितीच्या बॅनरखाली हे उमेदवार निवडणूक लढवतील.1987 मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील हिंदू मुन्नानी संघटनेनं केरळमध्ये काही ठिकाणी उमेदवार दिले होते. राज्यातील सहा मतदारसंघात हिंदू मुन्नानीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. याशिवाय इतर मतदारसंघांमध्येही त्यांनी एलडीएफ आणि यूडीएफचा चांगली टक्कर दिली होती. काही महिन्यांपूर्वीच केरळच्या सबरीमाला मंदिराचा वाद प्रचंड गाजला होता. या मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयानं सर्व वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशाचा अधिकार असल्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतरही सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास असलेला विरोध कायम आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आक्रमक भूमिका घेतली होती. ज्या निर्णयाची अंमलबजावणी शक्य नाही, असे निर्णय न्यायालय देतच कशाला, असा सवाल भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी उपस्थित केला होता. केरळमध्ये हिंदूंचं प्रमाण लक्षणीय असल्यानं भाजपानं ही भूमिका घेतली. त्यातच आता रेडी टू वेट ही मोहीम जोर धरु लागली. मंदिर प्रवेशासाठी आम्ही वाट पाहायला तयार आहोत, अशी भूमिका या मोहिमेतून महिलांनी मांडली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळत आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाSabarimala Templeशबरीमला मंदिरKeralaकेरळ