एक्स्प्रेस फिडरसाठी निधी देणार : शिवतारे
By admin | Updated: June 8, 2016 01:50 IST
सासवड : सासवड शहराला पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी विजेच्या कारणास्तव पाणी देता न आल्याचे या वेळी बैठकीत सांगितले.
एक्स्प्रेस फिडरसाठी निधी देणार : शिवतारे
सासवड : सासवड शहराला पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी विजेच्या कारणास्तव पाणी देता न आल्याचे या वेळी बैठकीत सांगितले.सासवडला पाणीपुरवठा करणार्या गराडे आणि घोरवडी या लघुपाटबंधारे प्रकल्पात अपुरा पाणीसाठा असून, आता दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय पालिकेने यापूर्वीच घेतला आहे. त्यात आता गेले ५ दिवस पुरेसा विद्युत पुरवठा नसल्याने पाणी बंद आहे. त्यामुळे वीर धरणात पाणी असूनही केवळ विजेच्या कारणास्तव पाणी बंद असल्याने विंधनविहिरींवर रात्रंदिवस पाण्यासाठी गर्दी होत आहे.या संदर्भात रविवारी दुपारी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या निवासस्थानी तातडीने घेण्यात आलेल्या बैठकीस मुख्याधिकारी दुर्वास, कर्मचारी भूतकर आणि सासवड महावितरणचे कार्यकारी अभियंता मदन शेवाळे, स्विय सहायक माणिक निंबाळकर, शिवसेना नगरसेवक डॉ. राजेश दळवी, शहराध्यक्ष अभिजित जगताप, सासवड संपर्कप्रमुख सचिन भोंगळे उपस्थित होते.येत्या दोन दिवसांत तातडीने वीर धरण क्षेत्रावरून सर्वेक्षण करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना सातारा जिल्ाचा पालकमंत्री या नात्याने मी दिल्या आहेत. भादे (ता. खंडाळा) येथील सबस्टेशनचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत एक्स्प्रेस फिडरच्या प्रस्तावावर कार्यवाही केली जाईल. तसेच फिडरसाठी लागणारा निधी लगेच देण्याची विनंती मंत्री बावनकुळे यांना करीत असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. त्याबाबत सातारा जिल्हा महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना सूचना देण्यात आल्या आहेत.लवकरच शहरास नियमित पाणी पुरवले जाईल, असे मुख्याधिकारी दुर्वास यांनी सांगितले. यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास दोन दिवस प्रत्येक वॉर्डनिहाय पाण्याचे टँकर देण्यात यावेत, त्याचा खर्च मी देण्याची व्यवस्था करतो, असेही शिवतारे यांनी सांगितले.