शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

PM नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाणार? SCO बैठकीसाठी शाहबाज शरीफ यांनी पाठवले निमंत्रण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 16:03 IST

पाकिस्तानमध्ये 15-16 ऑक्टोबर रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे आयोजन करण्यात आले आहे.

Pakistan Invitation to Narenrdra Modi : पाकिस्तानमध्ये 15-16 ऑक्टोबर रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना निमंत्रण पाठवले आहे. दरम्यान, पीएम मोदी पाकिस्तानात जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे यजमानपद सर्व सदस्य देशांकडे दिले जाते. यंदा याची जबाबदारी पाकिस्तानवर आली आहे. 15-16 ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये SCO बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पाकिस्तानचे वझीर-ए-आझम शाहबाज शरीफ यांनी पीएम मोदींना निमंत्रण दिले आहे. मात्र, पीएम मोदी इस्लामाबादला जाण्याची शक्यता कमी आहे. 

विशेष म्हणजे, पीएम मोदी नेहमीच विविध देशात आयोजित SCO बैठकीला उपस्थित राहतात, परंतु कझाकिस्तानमध्ये झालेल्या बैठकीला ते उपस्थित राहिले नव्हते. पंतप्रधानांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे यंदाही पंतप्रधान मोदी पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमी आहे.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) म्हणजे काय?शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली आहे. सुरुवातीला त्यात फक्त चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तानचा समावेश होता. 2001 मध्ये शांघाय फाइव्हवरुन शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये बदलल्यानंतर उझबेकिस्तानचा या संघटनेत समावेश करण्यात आला. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये SCO चे सदस्य झाले आणि इराणने 2023 मध्ये सदस्यत्व घेतले. 2024 च्या शिखर परिषदेत बेलारुसच्या सहभागानंतर सदस्य देशांची संख्या 10 झाली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान