शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'जमावाचा हिंसाचार खपवून घेणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 03:37 IST

जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराचा आपण व केंद्र सरकार तीव्र निषेध करीत असून, अशा घटनांतील आरोपींविरोधात कडक कारवाई करावी

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराचा आपण व केंद्र सरकार तीव्र निषेध करीत असून, अशा घटनांतील आरोपींविरोधात कडक कारवाई करावी, अशा सूचना राज्यांना दिल्या आहेत. अफवा पसरविल्या जाऊ नयेत म्हणून सोशल मीडिया कंपन्यांनीही काळजी घ्यावी, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले.स्वामी अग्निवेश यांना झारखंडमध्ये झालेली मारहाण, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केलेले ट्रोलिंग आदी मुद्दे काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी उपस्थित केले होते. त्यावर निवेदन करताना राजनाथ सिंह म्हणाले की, जमावाच्या हिंसाचारात काही निरपराधांचे बळीही गेले आहेत. कायदा व सुव्यवस्था हा राज्यांचा विषय असला तरी स्थिती बिघडत असेल तर केंद्र सरकार गप्प बसणार नाही.जयंत सिन्हा यांचा विरोधकांकडून निषेधझारखंड येथील एका मांस विक्रेत्याला ठार मारणाºया सात आरोपींचा पुष्पहार घालून सत्कार करणाºया केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांचा विरोधी सदस्यांनी जोरदार निषेध केला. विमानतळांच्या आधुनिकीकरणावर उत्तर देण्यासाठी सिन्हा उभे राहताच विरोधी सदस्यांनी अध्यक्षांसमोरील जागेत जाऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. जयंत सिन्हा यांनी माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती. त्याकडे दुर्लक्ष करीत सिन्हा यांनी उत्तर देणे सुरूच ठेवले. नितीन गडकरी यांनी विरोधकांना आपापल्या जागेवर जाण्याची विनंती केली. अर्थात सिन्हा यांचे उत्तर संपताच विरोधक आपल्या जागी गेले. आरोपींचा सत्कार केल्याबद्दल सिन्हा यांनी याआधी दिलगिरी व्यक्त केली आहे.>भाजपा सदस्यांकडूनच निषेधलोकांचे बळी घेणे, चोप देणे हे नित्याचे प्रकार झाले असल्याचा आरोप करून वेणुगोपाल म्हणाले की, हे घडूनही केंद्र सरकार शांतच आहे. एका प्रकरणातील आरोपींचा तर केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनीच सत्कार केला. याला कायद्याचे राज्य म्हणायचे का? ही स्थिती गंभीर असून लोकशाही वाचविण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलावीत. जमावाचा हिंसाचार रोखण्यासाठी कडक कायदा करायला हवा. त्यांचे भाषण सुरू असताना भाजपाचे काही सदस्य त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह