शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण न झाल्यास उड्डाणांवर जाणार नाही, वैमानिक संघटनेची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 01:48 IST

एअर इंडियाच्या वैमानिक संघटनेची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विमान कंपनीने तातडीने कोविड प्रतिबंधक लसीकरण न केल्यास उड्डाणांसाठी जाण्यास एअर इंडियाच्या पायलटांनी नकार कळविला आहे. कोरोनामुळे या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यामध्ये अडचणी येत असल्याने पायलट आक्रमक बनले आहेत. 

पूर्वाश्रमीच्या इंडियन एअरलाईन्समधील पायलटांची संघटना असलेल्या इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशनने एअर इंडियाच्या व्यवस्थापनाला पायलटांची मागणी कळविली आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना  कोरोनाची बाधा झाली आहे. या कर्मचाऱ्यांना कोणत्याही आरोग्यविषयक सुविधा मिळत नाहीत, तसेच त्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण नसते. त्यातच विमान कंपनीने मोठ्या पगारावर पगार कपात केल्याने त्यांना या आजारपणासाठीचा खर्च करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आता विमान कंपनीने तातडीने कर्मचारी आणि कुटुंबीयांचे लसीकरण करून द्यावे, अन्यथा पायलट उड्डाणासाठी जाणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. विमान कंपनीचे अनेक कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय कोरोनाने बाधित असून, त्यांना उपचारासाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याचेही या संघटनेने स्पष्ट केले आहे. जर तातडीने लसीकरणाची सोय केली नाही तर आमचे सदस्य उड्डाणाला जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले.

१० कर्मचारी विलगीकरणात एअर इंडियाचे १० कर्मचारी सध्या रोममध्ये विलगीकरणामध्ये आहेत. यामध्ये दोन पायलट आणि आठ कर्मचारी आहेत. यापैकी दोघे जण कोरोनाबाधित असून मागील बुधवारपासून ते तेथे अडकलेले आहेत. जगातील विविध देशांमध्ये विलगीकरणाचे नियम वेगवेगळे असल्याने त्याचा फटकाही या कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे संघटनेचे मत आहे. जगामधील विविध देशामध्ये एअर इंडियाची विमाने जात असतात.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाCorona vaccineकोरोनाची लस