शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हेमंत सोरेन सरकार देणार विश्वासमताची परीक्षा? ५ सप्टेंबरला विशेष अधिवेशन; ठराव पारीत करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 06:56 IST

jharkhand Political Crisis: झारखंडमधील राजकीय संकटाची टांगती तलवार असताना गुरुवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात ५ सप्टेंबर रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

- एस. पी. सिन्हारांची : झारखंडमधील राजकीय संकटाची टांगती तलवार असताना गुरुवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात ५ सप्टेंबर रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने सांगितले की, एक दिवसीय पावसाळी अधिवेशन घ्यायचे राहिले आहे. ते पाच सप्टेंबर रोजी बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात सरकार स्वत:च विश्वासमत प्राप्त करू शकते, असे समजले जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. बैठकीत एकूण २५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

एक-दोन दिवसांत स्थिती स्पष्ट होईल - राज्यपालयूपीएच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैंस यांची भेट घेतली. त्यानंतर झामुमोचे सरचिटणीस विनोद पांडेय यांनी सांगितले की, राज्यपालांनी सांगितले की, त्यांना निवडणूक आयोगाकडून पत्र प्राप्त झालेले आहे. यावर एक-दोन दिवसांत कायदेशीर सल्ला घेऊन स्थिती स्पष्ट केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेचा इन्कार करून पांडेय म्हणाले की, राजभवनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे राज्यपालांनी सांगितले आहे. राज्यपालांनी १-२ दिवसांत आपला निर्णय आयोगाकडे पाठविणार आहेत.

बैठकीसाठी रायपूरहून आले मंत्रीराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्र्यांना रायपूरहून रांचीमध्ये बोलावण्यात आले होते. झामुमोच्या कोट्यातील मंत्री आधीपासूनच रांचीमध्ये होते, तर काँग्रेसच्या कोट्यातील ४ मंत्री रायपूरला होते. त्यांना बुधवारी सायंकाळी विशेष विमानाने रांचीमध्ये बोलावण्यात आले होते. राज्यातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्री रायपूरला रवाना होण्याची शक्यता आहे.

आरपीएन सिंह यांच्यावर काँग्रेस फोडण्याची जबाबदारीभाजपमध्ये जाण्यापूर्वी आरपीएन सिंह झारखंड काँग्रेसचे प्रभारी होते. राज्यात काँग्रेस मजबूत उभी करण्यात व सत्तेत वाटा मिळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तिकीट वाटपापासून ते मंत्री निश्चित करण्यापर्यंत सर्व कामे त्यांनीच केली होती. त्यामुळे काँग्रेस फोडण्याची जबाबदारी भाजपने त्यांच्यावर सोपविली आहे, असे समजते. अनेक आमदार सिंह यांच्या थेट संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मात्र, कोणताही प्रकार टाळण्यासाठी अविनाश पांडे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारण