शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:20 IST

श्रीनगर: जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील दुहेरी सत्ता रचनेमुळे विकासाची गती मंद असून लवकरच राज्याचा दर्जा बहाल न केल्यास त्यांचा पक्ष ...

श्रीनगर: जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील दुहेरी सत्ता रचनेमुळे विकासाची गती मंद असून लवकरच राज्याचा दर्जा बहाल न केल्यास त्यांचा पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाईल, असा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा उघडपणे इशारा देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. 

अब्दुल्ला यांनी शनिवारी सांगितले की, ऑक्टोबर २०२४ मध्ये निवडून आलेले सरकार स्थापन होऊनही पूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. २०१९ मध्ये या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले. 

दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते म्हणाले की, लोकांना आशा होती की नवीन सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल. परंतु राज्याचा दर्जा नसणे हा एक मोठा अडथळा आहे. राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय आपण लोकांच्या आकांक्षा कशा पूर्ण करू शकतो?

फारुक अब्दुल्ला म्हणाले की, काही राजकीय शक्ती त्यांच्या हितसंबंधांशी तडजोड करण्यास तयार आहेत, हे पटवून देण्यासाठी आमच्या पक्षाने एक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या आठ महिन्यांच्या कार्यकाळानंतरही आम्ही राज्याचा दर्जा परत मिळेल याबद्दल आशावादी आहोत.  पण जर आणखी विलंब झाला, तर आमच्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. 

काश्मीरमधील सरकार आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यातील सत्ता संघर्ष अधिकाधिक तीव्र झाला आहे. मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी सिन्हा यांच्यावर प्रशासकीय निर्णयात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. 

सत्तेच्या केंद्रीकरणावर सज्जाद लोन यांची टीका 

पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांनी राज्याच्या दर्जाच्या मागणीला पाठिंबा दिला. पण नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळावर टीका केली आहे. 

केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा निश्चितच विकासाला मर्यादा घालतो. पण जे अधिकार दिले गेले आहेत, ते या सरकारने वापरले नाहीत. त्याऐवजी त्यांनी प्रशासनातील बदल्यांचा शस्र म्हणून वापर केला आणि ज्या मतदारसंघात त्यांना विजय मिळवता आला नाही, त्यांच्या बाबतीत भेदभाव केला. 

त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील सत्तेच्या केंद्रीकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांकडे ३२ विभाग आहेत. एखाद्या व्यक्तीसाठी ३२ विभाग चालविणे मानवीदृष्ट्या शक्य आहे का? असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Central Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय