शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

केंद्रीय मंत्र्यांसोबत गिरीश महाजन अण्णांना भेटणार, सरकारचा प्रस्ताव मान्य होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 09:31 IST

शेतमालाला दीडपट भाव, लोकायुक्तांची नियुक्ती यांच्यासह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलनास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्रीय मंत्र्यांसोबत भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीनंतर सरकारचा प्रस्ताव अण्णांना मान्य होणार आहे का? याबाबत चर्चा सुरु आहे. 

ठळक मुद्देसरकारचा प्रस्ताव अण्णांना मान्य होणार आहे का? याबाबत चर्चा सुरुगिरीश महाजन केंद्रीय मंत्र्यांसोबत अण्णा हजारेंची भेट घेणारअण्णांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस

नवी दिल्ली : शेतमालाला दीडपट भाव, लोकायुक्तांची नियुक्ती यांच्यासह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर आंदोलनास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्रीय मंत्र्यांसोबत भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीनंतर सरकारचा प्रस्ताव अण्णांना मान्य होणार आहे का? याबाबत चर्चा सुरु आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास गिरीश महाजन केंद्रीय मंत्र्यांसोबत अण्णा हजारेंची भेट घेणार आहे. दरम्यान,  मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय भेटायला येऊ नका, मी त्याशिवाय कुणाशीही चर्चा करणार नाही, असा स्पष्ट संदेश अण्णांनी गिरीश महाजन यांना पाठविला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना रविवारी दिल्लीतच ताटकळत थांबावे लागले.  भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अण्णांची मनधरणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सोपविली आहे. दिल्लीतून भाजपाचा एकही नेता अण्णांशी चर्चा करणार नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना अण्णांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पाठविल्याचे समजते.  दरम्यान, अण्णांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. त्यामुळे अण्णांची प्रकृती सातत्याने ढासळत असल्याने, केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे.

प्रकृतीची धास्ती!मागच्या आंदोलनांच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला असला, तरी अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची भाजपाने धास्ती घेतली आहे. अण्णांची प्रकृती अजून ढासळल्यास, भाजपाला त्याचा फटका बसू शकतो. अण्णांना लोकांचे समर्थन मिळू शकते. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेGirish Mahajanगिरीश महाजन