शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बेदरकारपणे गाडी चालविल्यास वाहन विमा पडणार महाग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 06:37 IST

तुम्ही वाहन कसे चालविता यावरून ठरणार विम्याचा हप्ता

नवी दिल्ली : तुम्ही गाडी कशी चालवता, तसेच तुम्ही किती अपघात केले आहेत, यावरून तुमच्या वाहन विम्याचा हप्ता ठरणार असून, यासंबंधीचा निर्णय लवकरच अंमलात आणला जाऊ शकतो.

देशातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नवा कायदा नुकताच अंमलात आला आहे. त्यानुसार, वाहतुकीचे नियम मोडल्यास लागणाऱ्या दंडात अनेक पट वाढ करण्यात आली आहे. यापुढील टप्पा म्हणून वाहतूक नियमांच्या भंगाचा वाहन विम्याशी संबंध जोडण्याचा निर्णय घेतला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. वाहन विम्याचे हप्ते नियमभंगाशी जोडण्यासाठी आवश्यक अंमलबजावणी चौकट आणि पद्धती याबाबतच्या शिफारशी करण्यासाठी विमा नियामक ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ने (इरडा) नऊ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. समितीला दोन महिन्यांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. गृहमंत्रालयाच्या नेतृत्वाखालील, तसेच दिल्लीतील वाहतूक व्यवस्था पाहणाºया उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनंतर इरडाने ही समिती स्थापन केली आहे. यासंबंधीचा पथदर्शक प्रकल्प तत्काळ सुरू करण्यासाठी योजना सुचविण्याचे निर्देश इरडाच्या समितीला दिले.

बेदरकारपणे वाहने चालवून निष्पाप नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांना कसे वठणीवर आणायचे, यावर कित्येक वर्षांपासून विचारविनिमय सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, इरडा समितीच्या संदर्भ शर्तीनुसार, समितीला सर्व राज्यांच्या वाहतूक विषयीच्या नियमांचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. समिती वाहतूक नियमभंगासाठी स्थायी अंक व्यवस्था सुचविणार आहे. या अंकांनुसार विमा कंपन्या संबंधित व्यक्तीच्या वाहन विम्याचा हप्ता ठरवतील.७० टक्के अपघातांना चालकच कारणीभूतविचारमंथन सुरू असले तरी वाहन विमा आणि वाहतूकविषयक नियमभंग यांची सांगड घालण्यासाठी देशात पहिल्यांदाच पुढाकार घेण्यात येत आहे. काही पाश्चात्य देशांत याची आधीच यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. जगभरातील आकडेवारीवरून असे समोर आले आहे की, ७0 टक्के अपघाताला चालकांचे वागणेच कारणीभूत असते.