शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास नियंत्रण रेषादेखील ओलांडू; लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 10:08 IST

बालाकोटमधील दहशतवादी तळ पाकिस्तानकडून पुन्हा सक्रीय

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केलेले बालाकोटमधील दहशतवादी तळ पाकिस्ताननं पुन्हा सक्रीय केले आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर फार काळ लपाछपीचा खेळ चालणार नाही. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा गर्भित इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला दिला आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला.फेब्रुवारीमध्ये भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक करत बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र अवघ्या सात महिन्यांमध्ये पुन्हा एकदा बालाकोटमध्ये दहशतवादी सक्रीय झाले आहेत. या भागातून २५० ते ५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकनं नेमकं काय हाती लागलं, असा प्रश्न रावत यांना विचारण्यात आला. त्यावर जोपर्यंत सीमेपलीकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात नाही, तोपर्यंत नियंत्रण रेषा ओलांडणार नसल्याचं उत्तर रावत यांनी दिलं. 'पाकिस्तानकडून दहशतवादी नियंत्रित केले जातात. पाकिस्तानच्याच इशाऱ्यावरुन दहशतवादी कारवाया होतात. मात्र हा लपंडाव फार काळ चालणार नाही. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू. जमिनीवरुन किंवा हवाई मार्गानं नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करण्यास आम्ही कचरणार नाही,' असा स्पष्ट इशारा रावत यांना पाकिस्तानला दिला. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालत नाही, हा पाकिस्तानचा दावा असतो. मात्र पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद्यांची शिबिरं भरतात, हे सत्य आहे. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताविरोधात छुपं युद्ध लढायचं हे पाकिस्तानचं कारस्थान आहे, असंदेखील रावत म्हणाले.  

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी