शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक मॅजिकनं कोसळेल काँग्रेस सरकार? शत्रु भैरवी यज्ञ, अघोरी अन्...; डीके शिवकुमार यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 13:47 IST

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यातील काँग्रेस सरकार विरोधात केरळमधील एका मंदिरात ‘शत्रु भैरवी यज्ञ’ नावाचे अनुष्ठान केले जात आहे. यात प्राण्यांचा बळी दिला जातो, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे...

कर्नाटकातील सिद्धारामय्या सरकारला कथित काळ्या जादूने सरकार कोसळण्याची भीती वाटू लागली आहे. केरलमधून कर्नाटक सरकार पाडण्याचा कट आखला जात असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री सीएम डीके शिवकुमार यांनी केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यातील काँग्रेस सरकार विरोधात केरळमधील एका मंदिरात ‘शत्रु भैरवी यज्ञ’ नावाचे अनुष्ठान केले जात आहे. यात प्राण्यांचा बळी दिला जातो, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, कर्नाटकातील काही नेते हे काम करून घेत आहेत. यासाठी अघोरींची मदत घेतली जात आहे, असा आरोपही त्यांनी कुणाचे नाव न घेता केला आहे.

डीके शिवकुमार हे सध्या एक ब्रेसलेट परिधान करत आहेत. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'माझ्या आणि आमच्या सरकारविरोधात केरळमध्ये एक मोठा प्रयोग सुरू आहे. यासंदर्भात कुणी मला लेखी माहिती दिली आहे. ही पूजा कुठे होत आहे आणि कोण करत आहे? हे देखील मला सांगण्यात आले आहे.' हे आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

शिवकुमार यांच्या दाव्याने खळबळ - डीके शिवकुमार म्हणाले, ‘शत्रूचा नाश करण्यासाठी केरळमधील राजराजेश्वरी मंदिराजवळ शत्रु भैरवी यज्ञ केला जात आहे. या यज्ञासाठी ‘पाच बळी’ अर्पण करण्यात येत आहे. अघोरींशी संपर्क साधला जात आहे. तसेच, केरळमध्ये हा यज्ञ कोण करत आहे? यासंदर्भात अनुष्ठानात सहभागी असलेल्यांनीच आपल्याला माहिती दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

अशा यज्ञ आणि कर्मकांडांवर आपला विश्वास आहे का? असे विचारले असता, 'हे व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. त्यांना माझ्याविरोधात काहीही प्रयोग करू द्या, एक शक्ती आहे, जिच्यावर माझा विश्वास आहे. ती माझे रक्षण करेल,’ असे ते म्हणाले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसKeralaकेरळ