शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी, योगींविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन; भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 08:42 IST

सीएएच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला संबोधित करताना भाजपा मंत्री बरळला

अलीगढ: सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला संबोधित करताना भाजपा नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रघुराज सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यास जिवंत गाडेन, असं सिंह म्हणाले. अलीगढमधील नुमाइश मैदानावर रविवारी सिंह यांचं भाषण झालं. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी एका जनसभेला संबोधित करण्यासाठी अलीगढमधील नुमाइश मैदानात पोहोचले. त्यांच्या आधी रघुराज सिंह यांनी उपस्थितांना संबोधित केलं. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी थेट इशारा दिला. 'मोदी आणि योगी यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना मी जिवंत गाडेन,' असं वादग्रस्त विधान सिंह यांनी केलं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतानाही सिंह यांची जीभ घसरली. नेहरूंची कोणती जात आहे का? त्यांचं तर कुटुंबदेखील नव्हतं, असं ते म्हणाले. रघुराज सिंह यांनी अलीगढ विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना थेट धमकी दिली. 'ही मूठभर मंडळी, केवळ एक टक्का असलेली मंडळी, आपल्या देशाचा पैसा वाया घालवत आहेत. देशाशी बेईमानी करत आहेत. मोदी आणि योगी देशाला आणि राज्याला ज्या पद्धतीनं चालवत आहेत, त्याच पद्धतीनं यापुढेही चालवतील. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन. हा देश आम्ही चालवू. तुम्ही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. अन्यथा तुरुंगात टाकू. कोणालाही सोडणार नाही. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू. मग तुम्हाला जामीनदेखील मिळणार नाही,' असं सिंह म्हणाले.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू