शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी करत होती मारहाण, न्यायालयाला फोटो दाखवून पतीनं मिळवली सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 13:22 IST

ब-याचदा पतीनं अत्याचार केल्याचा घटना समोर आल्या आहेत.

नवी दिल्ली- ब-याचदा पतीनं अत्याचार केल्याचा घटना समोर आल्या आहेत. न्यायालयानं पतीच्या अत्याचारात पत्नीच्या बाजूनं निर्णय दिल्याचंही ऐकिवात असेल. परंतु दिल्लीच्या न्यायालयानं चक्क पत्नीच्या मारहाणीच्या विरोधात पतीला न्याय मिळवून दिला आहे. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या पतीनं आरोप केला आहे की, त्याची पत्नी त्याला मारहाण करते. त्यामुळे त्याच्या जीविताला धोका आहे. या प्रकरणाची न्यायालयानं गंभीर दखल घेत संबंधित व्यक्तीच्या घरावर लक्ष्य ठेवण्याची जबाबदारी त्याच्या भागातील एसएचओला दिली आहे. तसेच पत्नी करत असलेली मारहाण आणि कथित शिव्यांवर एसएचओला लक्ष ठेवून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.न्यायमूर्ती नजमी वजिरी यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्ते संजीव शर्मा यांना मिळणा-या धमक्यांच्या अनुषंगानं सुरक्षा पुरवली जाणार आहे. तसेच तपास अधिका-याला शर्माच्या पत्नीची बातचीत करण्याचाही सल्ला दिला आहे. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, असंही दिल्ली उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. याचिकाकर्त्यांनी विभागातील पोलिसांना स्वतःचा नंबर द्यावा. जेणेकरून आपत्कालीन स्थितीत पोलिसांशी संपर्क साधता येईल.शर्मा यांच्याकडून वकील आदित्य अग्रवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. शर्मा यांची पत्नी त्यांना मारहाण करत असल्याचं याचिकेत मांडलं आहे. शर्मा हे सरकारी शाळेत शिक्षण असून, ते शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत. शर्मा यांच्या माहितीनुसार, त्यांची पत्नी मुलांना आणि त्यांना मारहाण करते. तसेच त्यांच्या तीन गाड्यांचीही पत्नीनं तोडफोड केली होती. 

टॅग्स :Courtन्यायालय