शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यांपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे त्यांची दुसरी ग्लॅमरस पत्नी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 19:52 IST

कुमारस्वामी यांच्या राजकीय कारकीर्दीबरोबरच त्यांचे वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीविषयीची चर्चा सध्या रंगली आहे. 

बंगळुरू - येडियुरप्पा सरकार अवघ्या अडीच दिवसांत पडल्यानंतर आता कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून एच.डी. कुमारस्वामी यांचे नाव निश्चित झाले आहे. त्याबरोबरच कुमारस्वामी हे आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कुमारस्वामी यांच्या राजकीय कारकीर्दीबरोबरच त्यांचे वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीविषयीची चर्चा सध्या रंगली आहे. कुमारस्वामींची दुसरी पत्नी राधिका कुमारस्वामीचे नाव सध्या गुगलवर ट्रेंड करत आहे. नेटिझन्स त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सर्च करत आहेत. राधिका यांचे फोटो आणि व्हिडिओ सर्च करण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे राधिका ही कन्नडमधील प्रख्यात अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहे. ती आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. राधिका ही 31 वर्षांची असून,  58 वर्षांच्या कुमारस्वामी यांच्यापेक्षा ती तब्बल 27 वर्षांनी लहान आहे.

राधिका हिचा कुमारस्वामी यांच्याशी विवाह होण्यापूर्वी रतन कुमार याच्याशी लग्न झाले होते. मात्र त्यांच्यातील नाते फार काळ टिकले नव्हते. पुढे 2010 साली राधिका हिने आपण कुमारस्वामी यांच्याशी 2006 साली विवाह केल्याचा गौप्यस्फोट 2010 साली केला होता. कुमारस्वामी आणि राधिका यांना एक मुलगी असून, तिचे नाव शमिका आहे. तर राधिका यांच्याआधी कुमारस्वामींचा विवाह 1986 साली अनिता यांच्याशी झाला होता. या दोघांना एक मुलगा असून, त्याचे नाव निखिल गौडा आहे.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८kumarswamyकुमारस्वामीFamilyपरिवार