शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने पतीच्या गुप्तांगावर ओतले उकळते तेल, अनैतिक संबंधांच्या रागातून केले कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 12:57 IST

शशिकलचा पती एम परमेश्वरम (37) या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला मदुराईच्या राजाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देपेशाने रिक्षा चालक असणा-या परमेश्वरमचे विराट्टीपाथून येथे राहणा-या एक महिलेबरोबर सूर जुळले होते. दोघांमध्ये यावरुन खटके उडायला सुरुवात झाल्यानंतर परमेश्वरमने घरी येणे बंद केले.

मदुराई - कौटुंबिक वादातून 30 वर्षीय महिलेने पतीच्या गुप्तांगावर उकळते तोल ओतले. तामिळनाडूच्या मदुराई शहरात ही धक्कादायक घटना घडली.  पी. शशिकला असे आरोपी महिलेचे नाव असून  मदुराई शहर पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शशिकलचा पती एम परमेश्वरम (37) या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला मदुराईच्या राजाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेशाने रिक्षा चालक असणा-या परमेश्वरमचे विराट्टीपाथून येथे राहणा-या एक महिलेबरोबर सूर जुळले होते. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. त्याच रागातून शशिकलाने हे कृत्य केले. शशिकलाला जेव्हा नव-याच्या दुस-या स्त्रीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधांबद्दल कळले तेव्हा शशिकलाने त्याला जाब विचारला. दोघांमध्ये यावरुन खटके उडायला सुरुवात झाल्यानंतर परमेश्वरमने घरी येणे बंद केले. शशिकलाने एसएस कॉलनी पोलील स्टेशन गाठले. पोलिसांनी परमेश्वरमला बोलवून समज दिली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो दुस-या स्त्रीसोबत विराट्टीपाथून येथे रहात होता. 

अखेर सर्व बाजूंनी प्रयत्न करुन हरलेल्या शशिकलाने मागच्या आठवयात परमेश्वरमला फोन लावला व त्याच्याशी प्रेमाने बोलून समजूत घातली व त्याला रहाण्यासाठी घरी बोलावले. परमेश्वरमही शशिकलाच्या गोड बोलण्याला भुलला व शनिवारी रात्री घरी पोहोचला. शशिकलाबरोबर गोडी गुलाबीचा संवाद झाल्यानंतर परमेश्वरमला रात्री गाढ झोप लागली. 

त्यानंतर शशिकलाने एका पातेल्यात तेल गरम केले व तेच उकळते तेल परमेश्वरमच्या गुप्तांगावर ओतले. या हल्ल्यात परमेश्वरम गंभीररित्या भाजला असून त्याला राजाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कलम 324 आणि 506 या कलमांतर्गत एसएस कॉलनी पोलिसांनी शशिकलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली पण अजून अटक केलेली नाही. या जोडप्याला तीन मुले आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा