शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी बड्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर; हा बेरोजगार झालेला, तिचे अफेअर असल्याचा संशय अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 18:51 IST

crime news UP: चर्चा करण्यासाठी म्हणून पती-पत्नी त्यांच्या बेडरुममध्ये गेले होते. बंद खोलीत पतीने पत्नीवर हातोड्याने वार केले आहेत. 

नोएडामध्ये नोकरी गमावलेल्या पतीने बड्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेवेळी त्यांची मुले आणि पतीचे आई वडील घरातच होते. चर्चा करण्यासाठी म्हणून पती-पत्नी त्यांच्या बेडरुममध्ये गेले होते. बंद खोलीत पतीने पत्नीवर हातोड्याने वार केले आहेत. 

पोलीस तपासात असे पुढे आले आहे की, पत्नीचे कोणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. पती घरीच होता, त्याची नोकरी गेली होती. यामुळे पत्नीच्या कमाईवरच घर चालत होते. ती एका चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होती. बऱ्याचदा ती कामात व्यस्त असायची, फोनवर बोलत असायची किंवा उशिराने घरी यायची. यामुळे पतीला तिचे कुठेतरी बाहेर लफडे सुरु असल्याचे वाटू लागले होते. यातूनच त्यांच्यात वाद होत होते. 

खोलीत गेल्यावरही याच विषयावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. वाद वाढला तसा पतीने रागात तिच्या डोक्यावर हातोडा मारला. यात तिचा मृत्यू झाला. पोलीस ठाण्याला फोन करून मुलाने या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेचच त्याच्या घरी धाव घेतली व पत्नीचा मृत्यू झाल्याचे तपासून तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला. 

पोलिसांनुसार नोएडातील सेक्टर-१५, सी-१५४ येथे राहणारे नुरल्लाह हैदर (५५) याने त्याची पत्नी आस्मा खान (४२) हिच्या डोक्यावर हातोड्याने वार करून तिची हत्या केली. घटनेची माहिती मृताच्या मुलाने दिली आहे. आरोपी पती नुरल्लाह हैदरला पोलिसांनी अटक केली आहे.

सध्याच्या काळात कौटुंबीक वादांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. मोबाईलमुळे जग जवळ आलेले असले तरी सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहेच परंतू अनैतिक संबंधांच्या संशयातून किंवा खरोखरच संबंध असल्याने गुन्ह्यांतही वाढ झालेली आहे. नुकतीच पिंपात सिमेंट काँक्रीटमध्ये पुरल्याची घटनादेखील अशाच अनैतिक संबंधातून घडली होती. अशा घटनांमुळे आता अनेकांच्या मनात भीती देखील निर्माण झाली आहे. यातून आपलीच पत्नी आपल्यासोबत असे काही तरी करेल असेही आरोप करत पोलिसांची मदत मागणारे पती देखील समोर येत आहेत. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपCrime Newsगुन्हेगारी