शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

अतूट प्रेम! पत्नीच्या मृत्यूनंतर काही तासात पतीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 17:46 IST

पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या 12 तासांतच पतीचाही मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या 12 तासांतच पतीचाही मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूने पती काशीराम अत्यंत दु:खी झाले. त्यांना मोठा धक्का बसला. जवळचे नातेवाईक त्यांची सतत काळजी घेत होते. नातेवाईक त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. पण काशीराम यांची मनस्थिती अत्यंत वाईट होती. याच दरम्यान विरह सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला

फतेहाबादच्या जोनेश्वर घाटावर दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. मृत्यूपूर्वी या जोडप्याने एकत्रच हे जग सोडण्याची चर्चा होती. अखेर त्यांचं म्हणणं खरं ठरलं. या दाम्पत्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.  फतेहाबाद शहरातील आंबेडकर परिसरात ही घटना घडली आहे. 

कमलेश उर्फ ​​मलुकी यांचं लग्न नगला येथील रहिवासी काशीराम यांच्याशी 40 वर्षांपूर्वी झालं होतं. त्यांचा संसार सुखाने सुरू होता. कमलेश नेहमीप्रमाणे घरातील काम करत होत्या. मात्र 10 वाजण्याच्या सुमारास अचानक छातीत दुखू लागलं. त्यानंतर हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला. 

कमलेश यांचा भाऊ विजेंद्र डेहराडूनमध्ये सरकारी शिक्षक म्हणून काम करतो. बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी तो येणार होता. मात्र त्याला वेळ लागणार होता. अंत्यसंस्कारासाठी सर्वजण विजेंद्रच्या येण्याचा वाट पाहत होते. मात्र रात्री कमलेश यांचा नवरा काशीराम यांनाही अटॅक आला. त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले.