शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम कायद्यानुसार विधवेचा वारसा हक्क वैध; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 09:31 IST

विक्रीचा करार मालकीहक्क देत नाही व अशा करारातून कोणताही कायदेशीर हक्क हस्तांतरित होत नाही, हा कायद्यातील प्रस्थापित सिद्धांत आहे. विक्रीखत हे चंद खान यांच्या मृत्यूनंतरच झाले. मृत्युसमयी मालमत्ता त्यांच्या नावावर होती. मृत्यूनंतर ती संपत्ती मत्रुका म्हणून समजली जाते. 

नवी दिल्ली : एखादी मालमत्ता विकण्याचा करार केल्याने तिचे मालकी हक्क हस्तांतरित होत नाहीत. मालमत्ता विक्रीचा करार म्हणजे मालकीहक्क नव्हे. त्यामुळे मृत व्यक्तीने मागे ठेवलेली सर्व संपत्ती ही मुस्लीम वारसाहक्क कायद्यानुसार विभागली जावी व त्याला मत्रुका संपत्ती मानले जावे, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. संजय कर्ण व प्रशांत कुमार मिश्रा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. 

नेमके प्रकरण काय आहे?मुंबईत राहणाऱ्या झोहरबी या महिलेचा पती चंद खान याचा मृत्यू झाला. दोघांना अपत्य नव्हते. त्यामुळे चंद खान याच्या पश्चातील संपत्तीत आपला तीन चतुर्थांश वाटा असल्याचा दावा झोहरबी यांनी केला. चंद खान याच्या पश्चातली संपत्ती ही मत्रुका संपत्ती असून मुस्लीम कायद्यानुसार ती विभागली जावी, असे त्यांचे म्हणणे होते. पण, चंद खान यांचा भाऊ इमाम खान यांनी हा दावा फेटाळत चंद खान यांनी जिवंतपणीच काही मालमत्ता विक्रीकराराद्वारे इतरांना दिल्या होत्या. त्यामुळे झोहरबी यांना तो हक्क नसल्याचे म्हटले.  

न्यायालयाने काय म्हटले...विक्रीचा करार मालकीहक्क देत नाही व अशा करारातून कोणताही कायदेशीर हक्क हस्तांतरित होत नाही, हा कायद्यातील प्रस्थापित सिद्धांत आहे. विक्रीखत हे चंद खान यांच्या मृत्यूनंतरच झाले. मृत्युसमयी मालमत्ता त्यांच्या नावावर होती. मृत्यूनंतर ती संपत्ती मत्रुका म्हणून समजली जाते. 

अनुवादावर नाराजी अरबी शब्द मत्रुका व त्याला अनुसार माहिती याचा अनुवाद कनिष्ठ न्यायालयाने योग्य केला नव्हता, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली. अरबी भाषेत मत्रुका म्हणजे एका मृत व्यक्तीने मागे सोडलेली मालमत्ता असा अर्थ आहे. तिचे विभाजन मुस्लीम वारसा कायद्यानुसार होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Widow's Inheritance Right Valid Under Muslim Law: Supreme Court

Web Summary : Supreme Court rules property sale agreement doesn't transfer ownership. Deceased's assets are 'matruka' (inherited property) to be divided per Muslim law. Widow entitled to share even if agreements existed.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयMuslimमुस्लीम