शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असणार वाय-फाय सुविधा, 2018 अखेरपर्यंत साडेसात लाख हॉटस्पॉट स्थापन करण्याचा सरकारचा मानस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 08:39 IST

पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वायफायच्या माध्यमातून कमीत कमी साडेसात लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित केले जाणार आहेत.

ठळक मुद्देडिजिटल इंडियाच्या दिशेने केंद्र सरकारने मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वायफायच्या माध्यमातून कमीत कमी साडेसात लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित केले जाणार आहेत. अर्ध शहरी आणि ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट सुविधा सुरू करण्याची सरकारची योजना आहे.

नवी दिल्ली- डिजिटल इंडियाच्या दिशेने केंद्र सरकारने मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वायफायच्या माध्यमातून कमीत कमी साडेसात लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित केले जाणार आहेत. अर्ध शहरी आणि ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट सुविधा सुरू करण्याची सरकारची योजना आहे. यासाठी खासगी कंपन्याही इंटरनेट सेवा देणार आहेत.इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर्स व्यतिरिक्त रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि सरकारी कंपनी बीएसएनएलच्या मदतीने या योजनेला पूर्ण केलं जाणार आहे. हायस्पीड आणि स्वस्त इंटरनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल विकासासाठी लोकांचा पुढाकार वाढविण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती दूरसंचार सचिव अरूणा सुंदराजन यांनी दिली आहे. 

दुनियेतील अनेक देशांमध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचं मूळ हे वायफाय सुविधा असतं. पण भारत यामध्ये बराच मागे आहे. आकडेवारीनुसार,2016 पर्यंत भारतात फक्त 31 हजार हॉटस्पॉट होते. तर फ्रान्समध्ये 1 करोड तीन लाख, अमेरिकेत 98 लाख आणि ब्रिटनमध्ये 56 लाख हॉटस्पॉट आहेत. भारतातील हॉटस्पॉटची आकडेवारी या तुलनेत अतिशय कमी आहे. 

देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फायबर नेटवर्क पसरविण्याचं काम जोरदार सुरू आहे. आत्तापर्यंत 75 हजार ग्रामपंचायतींमध्ये काम पूर्ण झालं असून डिसेंबरपर्यंत एक लाख ग्रामपंचायतींमध्ये फायबर नेटवर्क पसरविण्याचा संकल्प असल्याचं सुंदराजन यांनी सांगितलं. दूरसंचार मंत्रालय वाय-फायच्या या मेगा प्रोजेक्टसाठी टेंडरही जारी करणार आहे. मंत्रालयाने सगळ्या राज्य सरकारच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. आरोग्य, शिक्षण आणि ग्रामिण विकाससारख्या क्षेत्रांमध्ये डिजिटल सेवा पोहचविण्याच्या तर्कांवर विचार करण्याबद्दल या बैठकित सांगण्यात आलं.

दूरसंचार कंपन्या संपूर्ण देशात 4जी स्पीडचं नेटवर्क पसरवते आहे पण ग्रामीण भागात अजूनही हे काम खूप संथ गतीने सुरू आहे. या ग्रामीण भागांमध्ये हायस्पीड इंटरनेट पोहचविण्याची योजना सरकारने आखली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तीन वाय-फाय स्पॉट असावे, अशी सरकारची योजना आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एख जीबी डेटा देण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं सुंदराजन यांनी सांगितलं.