शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही तुम्हाला हिशेब का देऊ? अमित शहा यांचा राहुल यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 05:01 IST

तुमच्या पक्षाने ५५ वर्षे आणि तुमच्या घराण्याने चार पिढ्या राज्य करूनही देशाचा काही विकास केला नाही. तेव्हा आम्ही गेल्या चार वर्षांत काय काम केले याचा हिशेब आम्ही तुम्हाला देण्याची गरज नाही

सुरगुजा (छत्तीसगढ) - तुमच्या पक्षाने ५५ वर्षे आणि तुमच्या घराण्याने चार पिढ्या राज्य करूनही देशाचा काही विकास केला नाही. तेव्हा आम्ही गेल्या चार वर्षांत काय काम केले याचा हिशेब आम्ही तुम्हाला देण्याची गरज नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सांगून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथे छत्तीसगढमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल फुंकले.छत्तीसगढमध्ये या वर्षांत नंतर विधानसभा निवडणूक व्हायची आहे. त्याआधीच मुख्यमंत्री रमण सिंग यांनी राज्यभर विकासयात्रांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्त झालेल्या सभेत राहुल गांधींना वरीलप्रमाणे टोला लगावत शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.अमित शहा म्हणाले, राहुल बाबा, आमच्याकडे चार वर्षांचा हिशेब तुम्ही का मागता? आम्ही तुम्हाला कोणताही हिशेब देण्याची गरज नाही. जेव्हा आम्ही लोकांकडे मते मागायला जाऊ तेव्हा प्रत्येक मिनिटाचा आणि प्रत्येक पैशाचा हिशेब आम्ही त्यांना देऊ.काँग्रेस पक्षाने ५५ वर्षे व राहुल गांधींच्या घराण्याने चार पिढ्या राज्य केले. त्यामुळे आमच्याकडे चार वर्षांचा हिशेब मागण्याआधी काँग्रेस व राहुल गांधींनी आधी स्वत:कडेच हिशेब मागावा, असे शहा यांनी सूचविले.आरक्षण अबाधित राहीलनिवडणुका जवळ येतील तसा काँग्रेसचा खोेटा प्रचार सुरू होईल. अ‍ॅट्रॉसिटी कायदा मोदी सरकार बाद करणार आणि राखीव जागाही मोडीत काढणार, अशा कंड्या पिकविल्या जातील; पण जोपर्यंत भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत या दोन्ही गोष्टी आहेत, तशाच अबाधित राहतील, अशी ग्वाही शहा यांनी दिली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाGovernmentसरकार