शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 10:13 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि मोदींच्या नेतृत्वात एनडीएनं 353 जागा जिंकल्या.

नवी दिल्ली-  लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि मोदींच्या नेतृत्वात एनडीएनं 353 जागा जिंकल्या. एकट्या भाजपानं बहुमताचा आकडा पार करत 303 जागांवर कब्जा मिळवला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले. तर नितीन गडकरींकडे रस्ते आणि वाहतूक मंत्रिपदच कायम ठेवण्यात आले. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रिपद सोपवण्यात आले असून, निर्मला सीतारामण अर्थखात्याची धुरा सांभाळत आहे. तर पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे खातं कायम आहे.या नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे साहजिकच तो चर्चेचा विषय ठरला. पण सुषमा स्वराज यांना पुन्हा मंत्रिमंडळात न घेण्यामागे दोन प्रमुख कारणं समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर करून टाकला होता. हा निर्णय सुषमा स्वराज यांनी कोणालाही न विचारता घेतल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे त्यांच्या तब्येतीचंही कारण पुढे केलं जात आहे. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांसह इतर नेते 75 दिवस उन्हातान्हातून प्रचार करत होते. सुषमा स्वराज जाहीर सभेत सहभागी झाल्या नव्हत्या. त्यांनी बंद दाराआड - एसीमध्ये दोन बैठका घेतल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव त्या प्रचारापासून दूर राहिल्यानं नेतृत्वाला आक्षेपही नव्हता. परंतु, एका फोन कॉलने पक्षनेतृत्वाच्या मनात थोडी चलबिचल झाली. एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याने भाजपा मुख्यालयात पत्रकार परिषद घ्यावी, असं नेत्यांना वाटत होतं. परंतु, दिल्लीत कुणीच उपलब्ध नव्हतं. त्यामुळे सुषमा स्वराज यांना फोन करण्यात आला. परंतु, तब्बल ७२ तास त्यांच्याकडून या फोनला काहीच उत्तर दिलं गेलं नाही. तेही तब्येतीच्या कारणास्तवच. अशावेळी, त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी न सोपवणंच श्रेयस्कर असल्याचं मोदी-शहांनी ठरवलं आणि त्यांना मोदी 2.0 तून बाहेर ठेवण्यात आलं. 

दुसरीकडे, अरुण जेटलींसारख्या अनुभवी आणि जाणकार नेत्याला मंत्रिमंडळात घेण्यासाठी मोदी स्वतः शेवटपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शपथ घेतली तर चालू शकेल का, याबाबत कायदेशीर सल्लाही घेण्यात आला होता. परंतु, 'तत्त्वनिष्ठ नेते' म्हणून ओळखले जाणाऱ्या अरुण जेटलींना सरकारी बंगला आणि गाडीचा मोह नव्हता. त्यांनी अत्यंत प्रांजळपणे नकार दिला. इतकंच नव्हे तर, जेटलींनी सरकारी बंगलाही रिकामा केला. आता ते त्यांच्या खासगी घरात राहत असून उपचार घेत आहेत.

(नाविका कुमार यांच्या टाइम्स नाऊवरील लेखावरून...)

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजArun Jaitleyअरूण जेटलीPM Narendra Modi Cabinetनरेंद्र मोदी मंत्रिमंडळ