शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मक्का मशीद आणि अजमेर ब्लास्ट प्रकरणात का केले नाही अपील? सरकारवर एवढे का भडकले ओवेसी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 19:22 IST

२००६ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटात १८९ लोक मारले गेले होते. तर ८०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

मुंबईमध्ये २००६ मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. एक-दोन नव्हे तर तब्बल ७ बॉम्बस्फोट केवळ ११ मिनिटांत झाले होते. यांत १८० हून अधिक लोकांचा बळी गेला होता. यासंदर्भात अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाने १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे दारवाजा ठोठावला आहे. सरकारच्या अपीलावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यासंपूर्ण प्रकरणावर आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी अत्यंत नाराज दिसत आहेत, त्यांनी सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले ओवेसी? -ओवैसी म्हणाले, न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे आणि १८ वर्षांनंतर तुरुंगातून सुटलेल्या आरोपींना पुन्हा अटक केली जाणार नाही, असे म्हटले आहे. मी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विचारू इच्छितो की जेव्हा हे लोक कायदेशीररित्याच नव्हे, तर पूर्णपणे निर्दोष आहेत तेव्हा तुम्ही हे अपील का दाखल करत आहात. 

याशिवाय ओवेसी म्हणाले, सरकारने घाईघाईने अपील केले, मात्र मक्का मशीद आणि अजमेर बॉम्बस्फोटासंदर्भात तसे केले नाही. उद्या मालेगाव प्रकरणातही निर्दोष सुटका झाली, तर तुम्ही अपील कराल का? हे खरे परिमान आहे. दहशतवाद समूळ नष्ट करायला हवा. मात्र, जर सरकार आरोपींच्या धर्माच्या आधारावर अपील करत असेल, तर दहशतवादाविरुद्धची तुमची लढाई कमकुवत होईल.

१८९ लोक मारले गेले होते, ८०० हून अधिक लोक जखमी झाले होते -२००६ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटात १८९ लोक मारले गेले होते. तर ८०० हून अधिक लोक जखमी झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाने २१ जुलै रोजी या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. २०१५ मध्ये, कनिष्ठ न्यायालयाने या १२ आरोपींना दोषी ठरवले होते, यांपैकी पाच जणांना मृत्युदंडाची, तर इतरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीState Governmentराज्य सरकारTerrorismदहशतवादSupreme Courtसर्वोच्च न्यायालय