शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील कलम 370 ची तात्पुरती तरतूद 'राजकारणा'मुळे 70 वर्षे राहिली; एस. जयशंकर यांचा विरोधी पक्षांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 08:41 IST

S Jaishankar : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संवाद साधला.

कोलकाता : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी जम्मू-काश्मीरमधून  (Jammu-Kashmir) कलम 370 (Article 370) हटवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. राजकीय मजबुरी देशाच्या सीमांना धोका पोहोचवणारी किंवा देशाच्या हिताला बाधक ठरू नये, असे एस. जयशंकर म्हणाले. तसेच, विरोधी पक्षांवर टीका करताना एस. जयशंकर यांनी सवाल केला की, जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 सारखी तात्पुरती तरतूद दीर्घकाळ सुरू ठेवण्यामागे राजकारणाशिवाय दुसरे काय कारण आहे?

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संवाद साधला. यावेळी एस. जयशंकर म्हणाले की, कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरसाठी केलेली तात्पुरती तरतूद 'राजकारणा'मुळे 70 वर्षांहून अधिक काळ राहिली. राष्ट्रहिताला प्राधान्य देणे सर्वात महत्त्वाचे आहे. देशाच्या मोठ्या हिताला बाधा पोहोचेल, असे राजकारण करू नये. हा सर्व नेत्यांचा पहिला दृष्टिकोन असला पाहिजे.

आपल्या सीमांना धोका निर्माण करणारे राजकारण होऊ नये. 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्याबाबत तात्पुरती तरतूद इतके दिवस टिकण्यासाठी राजकारणाशिवाय दुसरे कारण काय आहे, असा सवाल एस. जयशंकर यांनी केला. तसेच, खरं म्हणजे इथे गोष्टी इतक्या अव्यवस्थित होत्या की जगाने त्याचा वापर केला. देशाच्या राजकारणावर परिणाम होत असल्याने या मुद्द्यावर जनमत तयार करण्याची गरज असल्याचे एस. जयशंकर म्हणाले.

पाकिस्तानला एफ-16 सारखी लढाऊ विमाने दिल्याच्या मुद्द्यावर एस. जयशंकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'जर तुम्ही गेल्या 75 वर्षांचा विचार केला तर अशा पावलांनी लष्करी हुकूमशाहीला प्रोत्साहन देण्याशिवाय काहीही केले नाही'. तसेच, पाकिस्तानचे नाव न घेता, त्यांनी शेजारी असलेल्या देशाला आपल्या सीमेबाहेर दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या परिणामांचे 'मूल्यांकन' करण्यास सांगितले.

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होण्यापूर्वी अनेक दशके मुत्सद्दी म्हणून काम केलेले एस. जयशंकर म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताला आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व आहे. आज भारताकडे नेतृत्व आणि दूरदृष्टी तसेच चिकाटी आणि आपले जागतिक स्थान उंचावण्यासाठी वचनबद्धता आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरwest bengalपश्चिम बंगालJammu Kashmirजम्मू-काश्मीर