शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

...अन् दान करण्यासाठी काढलेले 500 रुपये राहुल गांधींनी पुन्हा खिशात ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 10:11 IST

राहुल गांधींच्या मध्य प्रदेश दौऱ्यादरम्यानची घटना

भोपाळ: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. डिसेंबरमध्ये मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे राज्यात राहुल गांधींच्या प्रचारसभा, बैठका सुरू आहेत. राहुल गांधी विविध धर्मस्थळांदेखील भेटी देत आहेत. काल राहुल गांधी ग्वाल्हेरमधील दाताबंदी छोड गुरुद्वाऱ्यात गेले होते. त्यावेळी तिथे घडलेल्या एका घटनेनं उपस्थितांपैकी अनेकांचं लक्ष वेधलं. एका स्थानिक वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, गुरुद्वाऱ्यात नमस्कार केल्यानंतर राहुल गांधी यांनी दानपेटीत टाकण्यासाठी 500 रुपयांची नोट काढली. मात्र तितक्यात त्यांच्या मागे उभ्या असलेले खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांना रोखलं. सिंधिया यांनी राहुल यांना राज्यात आचारसंहिता लागू असल्याची आठवण करुन दिली. यानंतर लगेचच राहुल यांनी 500 रुपयांची नोट पुन्हा खिशात ठेवली. ग्वाल्हेर-चंबळ भागाच्या दौऱ्याची सुरुवात राहुल यांनी दाताबंदी छोड गुरुद्वाऱ्याच्या भेटीनं केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि दीपक बावरिया त्यांच्यासोबत होते.राहुल गांधी यांनी गुरुद्वाऱ्यात नमस्कार केला. यानंतर गुरुद्वारा समितीनं राहुल यांचं स्वागत केलं. ग्वाल्हेर-चंबळच्या दौऱ्याची सुरुवात गुरुद्वारा भेटीनं करणारे राहुल गांधी त्यानंतर अचलेश्वर मंदिर आणि मोती मशिदीत गेले. मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. यानंतर 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागेल.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूक