शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जय शहा प्रकरणात पंतप्रधान गप्प का आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 23:04 IST

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या संशयास्पदरित्या वाढलेल्या व्यवसायाच्या प्रकरणाचा सध्या जो वाद उपस्थित झाला आहे.

कोलकाता - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या संशयास्पदरित्या वाढलेल्या व्यवसायाच्या प्रकरणाचा सध्या जो वाद उपस्थित झाला आहे. केंद्रात सत्तापालट झाल्यानंतर जय शहा यांच्या कंपनीच्या व्यवहारात अचानक १६ हजार पटींनी वाढ झाली. त्यावर पंतप्रधनांनी बोलले पाहिजे अशी मागणी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते डी राजा यांनी केली आहे. या प्रकरणातील तथ्य बाहेर येण्यासाठी त्याची चौकशी झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात मोदींनी मौन का पाळले आहे असा सवाल त्यांनी केला. आज पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधानांनी या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश देण्याची गरज आहे त्या शिवाय यातील नेमके तथ्य बाहेर येणार नाही. कायम दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा पंतप्रधानांनी आता स्वताहून काही कृती करण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.

देशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांवरही त्यांनी यावेळी टीका केली. ते म्हणाले की भारतीय लोकशाही केवळ द्विपक्षीय लोकशाहीं नाही. ही पहिल्यापासूनच बहुपक्षीय लोकशाही राहिली आहे. त्यांच्यावर आपले म्हणणे लादण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाऊ नये. भाजपचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी डाव्या, सेक्‍युलर आणि लोकशाहीवादी पक्षांच्या एकत्रिकरणाची गरज आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. 

काँग्रेसची भूमिका - 

भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल मोदी सरकार आल्यानंतरच हजारो रुपयातून कोट्यवधी रुपयात कशी परावर्तीत झाली . जय यांची कंपनी टेम्पल एंटरप्राइजेसला ५१ कोटींची रक्कम विदेशातून कोणत्या कामासाठी आली? कोणी दिली? का दिली? असे प्रश्न काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केले आहेत. एका खोलीचे भाडे ८० लाख रुपये प्रति महिना दाखविण्यात आले आहे. या खोलीत असे काय होते? एका वर्षात १६ हजार पट वाढ झालेल्या या कंपनीत किती कर्मचारी होते? एकूण देणे किती आणि त्यांची संपत्ती किती? याचा खर्च कसा केला जात होता?, असे प्रश्न काँग्रेसने केले. केआयएसएफने जय यांच्या कंपनीला १६ कोटींचे कर्ज विना तारण दिले. केआयएसएफने कोणत्या कंपनीला कर्ज दिले आहे काय? खंडेलवाल यांना सरकारी स्तरावर काही लाभ तर दिला गेला नाही ना? असे सवाल विचारत, सेबीने खंडेलवाल यांच्या कंपनीवर निर्बंध आणल्याचा उल्लेख काँग्रेसने केला. कालूपूर कॉ. आॅपरेटिव्ह बँकेने ६.२० कोटींच्या संपत्तीवर २५ कोटींचे कर्ज आरबीआयच्या कोणत्या नियमानुसार दिले? आयआरडीएने पीयूष गोयल यांच्याअंतर्गत काम करताना १०.३५ कोटींचे कर्ज खासगी कंपनीला कसे दिले? असेही काँग्रेसचे सवाल आहेत.