शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील 25 हजार संतांना लिहिणार पत्र; जाणून घ्या, कुठे बोलावणार? काय आहे इरादा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 18:44 IST

"यासाठी संत, आखाड्यांचे महंत, महामंडलेश्वर, मंदिरे आणि मठांचे प्रमुख यांना पाठवल्या जाणाऱ्या निमंत्रण पत्रांसाठी सर्व मठ, मंदिरे, आखाडे, पीठ आदींची यादी शासन व प्रशासन तयार करत आहे."

वाराणसी- सध्या उत्तर प्रदेश सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वतीने एक निमंत्रण पत्रका तयार करण्याच्या कामात गुंतले आहे. हे निमंत्रण पत्र देशभरातील संतांना पाठविले जाणार असून त्यांना एका ठिकाणी बोलावण्यात येणार आहे. खरे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काशी विश्वनाथ धाम या ड्रीम प्रोजेक्टच्या शुभारंभासाठी देशभरातील संतांना निमंत्रित करण्याची योजना आखली जात आहे. यासाठी काशीमध्ये येण्यासाठी तब्बल 25 हजार संतांना निमंत्रण पत्र पाठविले जाईल. यादरम्यान, संत मंडळींना काशीत झालेल्या बदलासंदर्भात माहिती दिली जाईल. 

यावेळी, संतांना माहिती दिली जाईल, की कशा प्रकारे चिंचोळ्या गल्ल्यांतून काढून बाबा विश्वनाथ यांचा भव्य आणि दिव्य धाम तयार करण्यात आला आहे. याच बरोबर, बाबा विश्वनाथ धाम तयार करताना आलेली आव्हाने आणि शहरांत केलेल्या बदलांसंदर्भातही संत मंडळींना माहितीही दिली जाईल.

भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित...महत्वाचे म्हणजे, 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन करणार आहेत. यासाठी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून दुसरीकडे देशभरातील 200 हून अधिक महापौरही वाराणसीत उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर संत, आखाड्यांचे महंत, महामंडलेश्वर, मंदिरे आणि मठांचे प्रमुख यांना पाठवल्या जाणाऱ्या निमंत्रण पत्रांसाठी सर्व मठ, मंदिरे, आखाडे, पीठ आदींची यादी शासन व प्रशासन तयार करत आहे. या कार्यक्रमात देशभरातील सर्व संतांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

निवडणुकीच्या दृष्टीने फायदेशीर -पंतप्रधान मोदींच्या वतीने देशभरातील संतांना पाठविले जाणारे हे पत्र उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरेल, असे मानले जात आहे. यामुळे भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला धार मिळेल. एवढेच नाही, तर सरकारकडून होत असलेल्या विकासकामांचीही लोकांना माहिती होईल. यामुळे निवडणुकीच्या काळात भाजपला नवी ताकद मिळेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसीyogi adityanathयोगी आदित्यनाथ