शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीसाठी ईशान्य दिल्लीच का?, अरुंद रस्ते व निमुळत्या गल्ल्या सोयीच्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:48 IST

उत्तर-पूर्व दिल्लीतील दंगल शमली तरी यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. दंगलीसाठी या भागाची का निवड करण्यात आली?

सुरेश भुसारी नवी दिल्ली : उत्तर-पूर्व दिल्लीतील दंगल शमली तरी यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. दंगलीसाठी या भागाची का निवड करण्यात आली? या भागातील लोकसंख्या व सामाजिक स्थितीचे पदरही या दंगलीने समोर आले आहेत. दिल्लील उत्तर-पूर्व दिल्ली जिल्हा हा देशातील सर्वात दाट लोकवस्तीच्या भागापैकी एक आहे. अरुंद रस्ते, निमुळत्या गल्ल्या हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. या निमुळत्या गल्ल्यांमुळे दंगेखोर नेमके कुठे लपले आहे. याचा सुगावा लोकांना येत नव्हता. एखाद्या गल्लीत दबा धरून बसलेले दंगेखोर लोक रस्त्यावर आल्यानंतरच थेट हल्ला करीत होते.उत्तर-पूर्व दिल्ली जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४० हजारावर आहे. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ३६,१५५ प्रती चौरस मीटर एवढी आहे. दिल्लीच्या इतर जिल्ह्याचा विचार केल्यास मध्य दिल्लीची लोकसंख्येची घनता २७,७३० प्रती चौरसमीटर एवढी आहे. नवी दिल्ली जिल्ह्याची लोकसंख्येची प्रती चौरस मीटर घनता केवळ ५११७ आहे. म्हणजे नवी दिल्ली जिल्ह्याच्या सातपटीने उत्तर-पूर्व जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता आहे. यावरून उत्तर पूर्व दिल्ली जिल्हा किती दाट लोकवस्तीचा आहे, हे स्पष्ट होते. दाट लोकवस्ती ही दंगल करणाऱ्यासाठी सोईची असते. कमी क्षेत्रामध्ये अधिक लोकांवर हल्ला करण्याची संधी या लोकसंख्येच्या घनतेमुळे मिळत असल्याने दंगलखोरांनी नियोजनपूर्वक या भागाची निवड केल्याचे स्पष्ट झाले आहे.>परावलंबी व्यक्तींचे प्रमाण अधिकया भागाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या जिल्ह्यात एकाच व्यक्तीवर अवलंबून असणाºया व्यक्तींची संख्या अधिक आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार या भागातील ७०.५ टक्के लोकसंख्या कमाविणारी नाही म्हणजे कुटुंबातील एका व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. या भागातील केवळ ३० टक्के व्यक्तींकडे उत्पन्नाचे साधन असून इतर यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. या दंगलीत उत्पन्न करणाºया व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले होते. या दंगलीनंतर या भागातील भीषण स्थितीला आता सामोरे जावे लागत आहे.>६ वर्षांखालील मुले जास्त : या जिल्ह्यात ६ वर्षांखालील मुलांची संख्या ही तब्बल ३ लाखांवर आहे. ही संख्या या जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या १३.४७ टक्के एवढी आहे. तसेच या भागाची निरक्षरताही सर्वाधिक आहे. या जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण ८२ टक्के एवढे आहे; परंतु महिला साक्षरतेचे प्रमाण हे केवळ ७६.५१ टक्के एवढेच आहे. हे प्रमाण नवी दिल्लीतल इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी आहे.>ग्राहक कुठे आहे?या संदर्भात बोलताना या भागातील ज्येष्ठ नागरिक म्हणाला, या दंगलीने या भागातील आर्थिक व्यवस्थाच कोलमडली आहे. आता दुकाने सुरू दिसत असले तरी ग्राहक कुठे आहे? असा त्यांचा सवाल होता. शनिवारला दुपारी या भागातील ९० टक्के दुकाने सुरू होती. परंतु ग्राहक मात्र नव्हते. शनिवारला दुपारी मौजपूर येथील ब्रह्मपुरी मार्ग निर्मनुष्य होता. या भागाची सामाजिक व आर्थिक स्थितीमुळे या भागाचे वास्तव अधिक भीषण झाल्याचे दिसून येत आहे.