शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

घर घेता का घर.... बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे घर विकणे आहे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 12:59 IST

वर्षभरापासून खरेदीदार येईना : वास्तव्यास असलेले पोकिया कुटुंब ‘व्हिजिटर्स’ने त्रस्त

कमलेश वानखेडे/ नंदकिशोर पुरोहित 

पनेली मोटी (राजकोट) :  पाकिस्तानच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे बॅरि. मोहम्मद अली जिना यांचे पनेली मोटी (जि. राजकोट) येथील घर विकायला काढले आहे. येथे तीन पिढ्यांपासून राहणारे पोकिया कुटुंब या घराला भेट देण्यासाठी येणाऱ्या ‘व्हिजिटर्स’ने त्रस्त झाले आहे. त्यांना हे घर विकून गावात मोक्याच्या जागी नवे घर बांधायचे आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून एकही खरेदीदार मिळाला नसल्याने पोकिया कुटुंब नाराज आहे.  

उपलेटा तालुक्यात पनेली मोटी हे सुमारे १८ हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील आझाद चौकात असलेल्या एका जुन्या घरी बॅरि. जिना  यांचा जन्म झाला. फाळणीनंतर जिना यांचे कुटुंबीय पाकिस्तानात निघून गेले व पोकिया कुटुंबाला या घराची मालकी मिळाली. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या घराला भेट दिली. सध्या नंदुबेन पोकिया यांच्या नावाने हे घर असून, मालकीची कागदपत्रेही त्यांच्याच नावाने आहेत. सध्या या घरात नंदुबेन यांच्यासह त्यांचा मुलगा प्रवीणभाई, पत्नी शोभा व दोन मुले असे पाचजण राहतात.

‘लोकमत’चा चमू घरी पोहोचला तेव्हा शोभा पोकिया (सून) या भाजी तोडत होत्या. पती प्रवीणभाई शेतावर कामासाठी गेले होते.  शोभाताई म्हणाल्या, दररोज देशभरातून कुणी ना कुणी हे घर पाहायला येतात. त्यामुळे आमची कामे खोळंबतात. दुपारी घटकाभर झोप घ्यायला गेले की कुणी ना कुणी बाहेरच्या दाराची कडी वाजवतो. आलेल्या प्रत्येकाला सर्व माहिती द्यावी लागते. आता आमच्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत. त्यांचे शिक्षण व पुढे लग्न करायचे आहे. त्यामुळे हे जुने घर विकून गावातच मोक्याच्या ठिकाणी दुसरे घर बांधायचे आहे. घराची किंमत विचारली असता ‘वो इनको पता है’ असे सांगत किंमत गुलदस्त्यातच ठेवली.  

अधिकारी घर पाहून गेले; पण पुढे काहीच नाही  शोभाताई म्हणाल्या, एक-दोन वेळा येथील अधिकारी आले. मोजणी केली. फोटो काढले. घर पाहून गेले; पण पुन्हा काही परतले नाही. प्रशासनातील कुणी अधिकारी येईल व या घराचा सोक्षमोक्ष लावतील, या आशेवर त्या वाट पाहत आहेत.

२२ वर्षांत पाकिस्तानहून कुणीच आले नाही! nशोभाताई म्हणाल्या, माझ्या लग्नाला २२ वर्षे झाली. या काळात पाकिस्तानातून कुणीच जिनांचे हे घर पाहायला आल्याचे आठवत नाही. nहिंदुस्तानमधून मात्र बरेच लोक येतात. कुतूहलाने घर पाहतात. फोटोही काढतात. जिनांचे घर येथे कुणी विकत घेत नसल्यामुळे पाकिस्तानातून कुणी खरेदीसाठी आले तर त्यांना विकू, असेही त्या नाराजीतून म्हणाल्या. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022ElectionनिवडणूकPakistanपाकिस्तान