शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अन्वयार्थ: पैशासाठी लोक पुन्हा-पुन्हा त्याच खड्ड्यांत का पडतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 09:34 IST

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडून 'पॉन्झी' योजनांमध्ये लोक पैसे का गुंतवतात? शहाणे कसे होत नाहीत?

अमित बिवलकर, वित्तीय बाजारांचे विश्लेषक, गुंतवणूक सल्लागार |

कमीत कमी काळात भरघोस आर्थिक परताव्यांचे आमिष देऊन गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या योजना (पॉन्झी) 'लाभ' आणि 'लोभ' यातील पुसट रेषा सहज ओलांडून जाणाऱ्या मानसिकतेचे अपत्य आहे. सध्या मुंबईतील 'टोरेस'मागोमाग छ. संभाजीनगरमध्ये असा एक नवा घोटाळा उघडकीला आला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमावली, शिक्षण आणि जनजागृती यांचा समन्वय आवश्यक आहे. अशा फसवणुकीचे अनेक प्रकार सातत्याने उघड होत असूनही लोक पुन्हा-पुन्हा त्याच खड्यात का पडतात? जास्त परताव्याच्या मागे का धावतात? याचे कारण मानसशास्त्र, सामाजिक आणि आर्थिक घटकांमध्ये आहे.

नक्की काय घडते?लोभ आणि अतिआत्मविश्वास या मानसिकतेच्या बळावर अशा योजनांचे सापळे उभे राहतात. जास्त परताव्याचे वचन लोभ जागा करतेआणि यामुळे विवेकबुद्धी कमी होते. अनेक लोक 'लवकर गुंतवणूक करून लवकर बाहेर पडू,' असे समजतात आणि स्वतःला या फसवणुकीपासून वाचवू शकतो, असा भ्रम तयार करतात. यशस्वी गुंतवणूकदारांच्या (अनेकदा खोट्या) गोष्टी ऐकून लोक घाईगडबडीत गुंतवणूक करतात, कारण त्यांना वाटते की, त्यांनी चांगली संधी गमावली तर? लोक जास्त परताव्यावर लक्ष केंद्रित करतात आणि जोखमीकडे दुर्लक्ष करतात. जास्त परताव्याबाबत कोणतीही हमी शक्य नाही, हे त्यांना उमजत नाही.

अनेकदा स्थानिक विक्रेत्यांवरचा विश्वास महत्त्वाचा ठरतो. अशा योजना प्रभावशाली स्थानिक व्यक्ती किंवा परिचितांच्या माध्यमातून प्रचारित केल्या जातात. त्यामुळे खोटा विश्वास निर्माण होतो. आजूबाजूचे, ओळखीचे, परिचयातले इतर लोक गुंतवणूक करताना दिसले, तर 'आपणही गुंतवू पैसे' असे वाटण्याची शक्यता जास्त असते. जे गुंतवणूकदार सुरुवातीला पैसे मिळवतात (प्लॅनच्या सुरुवातीच्या टप्प्यात), ते इतरांना प्रोत्साहन देतात, ज्यामुळे योजना वेगाने पसरते. कठीण आर्थिक परिस्थितीत, लोक आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी लवकर श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कमी बैंक व्याजदर आणि अस्थिर बाजारामुळे 'परताव्यांची खात्री' देणाऱ्या 'पॉन्झी' योजना हा अनेकांना अधिक सोपा आणि फायदेशीर पर्याय वाटतो. लोकांना जलद परताव्याची लालसा अधिक असते. पारंपरिक बचत किंवा गुंतवणूक कमी परतावा देत असल्याने लोक अशा योजनांकडे वळतात.

फसवणूक सहज शक्य का होते?गुंतागुंतीच्या आणि बोजड तांत्रिक आर्थिक शब्दांचा वापर करून योजनांमध्ये अंतर्भूत असलेली फसवणूक अनेकदा बेमालूमपणे लपवली जाते. अशा योजना 'फक्त निवडकांसाठी' असल्याचा आभास निर्माण करून गुंतवणूकदारांना विशेष वाटण्यास भाग पाडतात. खोट्या गुंतवणूकदारांच्या कथा प्रचारित करून लोकांचा आत्मविश्वास वाढवला जातो. सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना नवीन सदस्यांकडूनमिळालेल्या निधीने परतावा दिला जातो, ज्यामुळे योजना विश्वासार्ह वाटते.

सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना दिले जाणारे परतावे हे नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांवर अवलंबून असतात. त्यामुळे या योजनेसाठी सतत नवीन गुंतवणूकदारांची गरज असते, जी दीर्घकाळ टिकवता येत नाही. शेवटी, योजना अशा टप्प्यावर पोहोचते जिथे ती पूर्वीच्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी पुरेसा नवीन पैसा मिळवू शकत नाही. जेव्हा पुरेसा निधी येणे थांबते, तेव्हा योजना कोसळते आणि उशिरा गुंतवणूक केलेल्या लोकांना नुकसान सहन करावे लागते. सर्वसामान्यपणे, अशा योजना चालवणारी व्यक्ती किंवा संस्था शिल्लक रक्कम घेऊन पळून जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही.

हा चक्रव्यूह भेदण्यासाठी उपायसरकार, नियामक संस्था आणि आर्थिक सल्लागारांनी गुंतवणूक, जोखीम व्यवस्थापन, आणि फसवणूक ओळखण्यावर जनतेला शिक्षित करणे गरजेचे आहे. फसवणूक योजनांविरोधात त्वरित आणि कठोर कारवाई केली गेली पाहिजे. म्युच्युअल फंड, 'पीपीएफ' यांसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांना प्रोत्साहन असले पाहिजे. 'जर ते खूपच चांगले वाटत असेल तर ते खरे नसण्याची शक्यता जास्त आहे' हे सार्वकालिक सत्य होय!

टॅग्स :businessव्यवसाय