शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मी स्वतःची ओळख का लपवू?; वर्णिकाचं चोख उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 11:33 IST

शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा दोन जणांनी पाठलाग करून तिच्यासोबत छेडछाड केल्याची घटना घडली होती

ठळक मुद्देशुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा दोन जणांनी पाठलाग करून तिच्यासोबत छेडछाड केल्याची घटना घडली होती हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याने हा सगळा प्रकार केला होता. वर्णिका कुंडू हीने या संपूर्ण घटनेवर उत्तर दिलं आहे

चंदीगड, दि. 8- शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा दोन जणांनी पाठलाग करून तिच्यासोबत छेडछाड केल्याची घटना घडली होती. हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याने हा सगळा प्रकार केला होता. याप्रकरणी त्याला अटक झाली पण नंतर जामीन मिळाला. वर्णिका ही हरिणायाच्या आयएएस अधिका-याची मुलगी आहे. या प्रकरणी वर्णिका कुंडू हीने या संपूर्ण घटनेवर उत्तर दिलं आहे. वर्णिकाला तिच्यासोबत घडलेली घटना सगळ्यांना सांगायची आहे. छेडछाड प्रकरणातील पीडित मुली अनेकदा त्यांची ओळख लपवतात पण वर्णिकाला तिची ओळख लपवायची नाही.  घडलेल्या घटनेला जराही घाबरलr नसल्याचं वर्णिलाला या प्रकरणातील गुन्हेगारांना दाखवून द्यायचं आहे. 

मी माझी ओळखं का लपवू जर मी या घटनेतून वाचलेली मुलगी आहे, घटनेतील गुन्हेगार नाही. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वर्णिकाने तिचं मत मांडलं आहे. चंदीगडच्या रस्त्यावर 25 मिनिटं माझा पाठलाग केल्यानंतर त्या दोघांनी पोलिसांसमोर माझी माफी मागितली आणि मी तक्रार करू नये यासाठी मला विनंती केली. पण या संपूर्ण प्रकरणात त्या दोघांना पाठिशी न घालता मी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला, असं वर्णिकाने सांगितलं.

विकास बराला हा हरिणायाच्या प्रतिष्ठीत घरातील मुलगा आहे. इतकं होऊनही त्याला जामीन मिळण्याकडे वर्णिकाने फार लक्ष दिलं नाही. 'मी फक्त माझ्या एकटीला न्याय मिळावा यासाठी लढत नाही. तर याआधी ज्या मुलींसोबत असा प्रकार घडला आहे. त्यांच्यासाठीसुद्धा ही लढाई आहे. यापुढे मुलींबरोबर असा प्रकार करताना मुलं विचार करतील, असं वर्णिका म्हणाली आहे. भाजपच्या अधिकाऱ्यांनी वर्णिकाच्या राहणीमानाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून तिनं नाराजी व्यक्त केली आहे. चंदीगडमध्ये वर्णिका डीजे म्हणून काम करते. तिथे मोजक्याच मुली डीजे आहेत त्यात वर्णिका आहे.

त्या दिवशी रात्री उशिरा मी त्या रस्त्यावर काय करत होती ? हे मला विचारण्यापेक्षा त्या मुलांनाही विचारा त्यांनी काय केलं ? असं उत्तर तिने दिलं आहे. चंदीगड भाजपाचे उपाध्यक्षांनी वर्णिकाविषयी केलेल्या विधानावर उत्तर देताना तिने हे उत्तर दिलं. रात्री उशिरा वर्णिकाने बाहेर थांबायला नको होतं, असं ते म्हणाले होते. 

काही जणांनी सोशल मीडियावरून वर्णिकावर टीका करण्याचा प्रयत्न केला. तिच्या फेसबुकवरील जुन्या फोटोंवरून तिच्यावर टीका करण्याचा प्रयत्न झाला. वर्णिका विकासला आधीपासून ओळखत होती, असं मत सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आलं. तिचा एक मित्र विकास सारखा दिसतो यावरूनच लोकांनी हा निष्कर्ष काढला. पण सोशल मीडियावर माझे जे फोटो पोस्ट करण्यात आले त्या फोटोतील व्यक्ती वेगळी आहे. माझे जुने फोटो पोस्ट करून माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न झाला, असं वर्णिकाने सांगितलं आहे. 

डीजे असण्याव्यतिरीक्त वर्णिका कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. कराटे प्रशिक्षणाचा फायदा मला त्या घटनेच्या दिवशी झाल्याचं ती म्हणाली.  मुलींनी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घ्यायला हवं म्हणजे अशा प्रकारच्या घटना त्यांना हाताळता येतील, असंही वर्णिकाने म्हंटलं आहे.  माझ्यासोबत जे घडलं त्यासाठी आरोपी दोघांना शिक्षा व्हायलाच हवी, त्याशिवाय मला आनंद मिळणार नाही, असं तिने म्हंटलं आहे.