शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 21:43 IST

मोरक्कोच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले राजनाथ सिंह रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी कासाब्लांका येथे पोहोचले होते. भारत आणि मोरक्को यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ आकारला आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट भाष्य केले आहे. या करासंदर्भात बोलताना "भारता मोठ्या विचारांचा आहे, म्हणूनच यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही," असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते मोरक्कोमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधत होते.

मोरक्कोच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले राजनाथ सिंह रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी कासाब्लांका येथे पोहोचले होते. भारत आणि मोरक्को यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

अमेरिकन टॅरिफ संदर्भात नेमकं काय म्हणाले राजनाथ सिंह?टॅरिफ संदर्भात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, "आपण काहीही प्रतिक्रिया दिली नाही... जे लोक खुल्या विचारांचे आणि मोठ्या मनाचे असतात, ते कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत." त्यांचे हे विधान भारताचे धोरण शांततापूर्वक आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असल्याचे दर्शवते.

"लवकरच पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश" -यावेळी राजनाथ सिंह यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीचाही उल्लेख केला. भारताने डिजिटल क्षेत्रात केलेली क्रांती, ज्ञान-आधारित अर्थव्यवस्थेतील प्रगती आणि स्टार्टअप्समध्ये होणारी वाढ, यांसंदर्भात त्यांनी माहिती दिली. "जागतिक आव्हाने असूनही, भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. आपण ११ व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचलो आहोत आणि लवकरच जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पTrade Tariff Warटॅरिफ युद्ध