शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

इअरफोन का तोडला?  पत्नी गेली थेट माहेरी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 05:58 IST

पतीही तिला घेण्यासाठी माहेरी न आल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार केली. हे प्रकरण सुनावणीसाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचले.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे इअरफोन तोडण्यावरून पती-पत्नीमध्ये मोठा वाद होऊन दोघांच्या नात्यात दुरावा आला. इअरफोन तोडल्याने संतापलेली पत्नी माहेरी गेली ती तीन महिने तिथेच राहिली. पतीही तिला घेण्यासाठी माहेरी न आल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार केली. हे प्रकरण सुनावणीसाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचले.

समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी पती-पत्नीची तक्रार ऐकली असता, त्यांच्या नात्यात हा दुरावा केवळ इअरफोनमुळे आल्याचे समजले. ताजगंज भागातील एका तरुणाचा विवाह जगदीशपुरा येथील तरुणीशी चार वर्षांपूर्वी झाला होता. या जोडप्याला एक मुलगीही आहे. ३ महिन्यांपूर्वी पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते.

पत्नी मोबाइल फोनवर कोणाशी तरी बोलायची आणि तिचे त्याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय पतीला होता. या कारणावरून रागाच्या भरात पतीने पत्नीच्या मोबाइलचा इअरफोन तोडला. इअरफोन तोडल्याने संतापलेली पत्नी थेट माहेरी गेली. तीन महिने पतीही तिला घ्यायला आला नाही.

पती-पत्नीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर समुपदेशक खिरवार यांनी दोघांनाही समजावून सांगितले. यावेळी पतीने नवीन इअरफोन घेऊन दिला तरच मी सासरी येईन अशी अट पत्नीने टाकली. अखेर पतीनेही यासाठी होकार दिल्यानंतर इअरफोन घेऊनच पत्नी सासरी आली. इअरफोनचे हे प्रकरण सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर आपली मते व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश