शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:25 IST

रिमांडदरम्यान दोघांकडून काही अतिशय धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली असून, महिलांचा हेरगिरीसाठी वापर का करण्यात येत होता, हेही उघड झाले आहे.

उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासात पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले दोन आरोपी, वाराणसीचा तुफैल आणि दिल्लीतून अटक केलेला हारून यांच्या रिमांडचा कालावधी संपला आहे. रिमांडदरम्यान दोघांकडून काही अतिशय धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली असून, महिलांचा हेरगिरीसाठी वापर का करण्यात येत होता, हेही उघड झाले आहे.

पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाशी थेट संपर्क!यूपी एटीएसच्या सूत्रांनुसार, तुफैल आणि हारून दोघांनीही पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या 'मुज्जामिल' नावाच्या अधिकाऱ्याशी थेट संपर्कात असल्याची कबुली दिली आहे. मुज्जामिलकडून त्यांना स्पष्ट निर्देश मिळाले होते की, हेरगिरीसाठी महिलांना स्लीपर सेलमध्ये सामील करून घ्या.

महिलांचा वापर करण्याचं कारण काय?तपासादरम्यान, एटीएसने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दोघांनी कबूल केले की, सुरक्षा यंत्रणांकडून महिलांवर सहज संशय घेतला जात नाही, म्हणून त्यांचा वापर ‘सुरक्षित पर्याय’ म्हणून केला जात होता. त्यांना थेट हेरगिरीच्या हेतूची माहिती दिली जात नव्हती; त्याऐवजी विशिष्ट ठिकाणी माहिती पुरवण्याचे, फोटो-व्हिडीओ पाठवण्याचे किंवा एक्झिक्युशनसाठी विशिष्ट व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले जात होते.

हेरगिरीच्या नव्या मॉड्यूलचा ब्लूप्रिंटतुफैल आणि हारून यांनी चौकशीदरम्यान हेरगिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या नव्या मॉड्यूलचा संपूर्ण आराखडा (ब्लूप्रिंट) एटीएसला दिला. यात महिलांना सुरुवातीला सामाजिक काम, डेटा संकलन अशा नावाखाली जोडले जात होते. मात्र, काही महिलांना जेव्हा हेरगिरीचा संशय आला, तेव्हा त्यांनी सहभाग घेण्यास नकार दिला.

पैशांच्या ट्रान्सफरचा शोधहारूनने हेरगिरीच्या कामासाठी वापरलेले पैसे कोणत्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले गेले, याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत तीन बँक खात्यांची माहिती एटीएसच्या हाती लागली असून, संबंधित खातेदारांचा शोध घेतला जात आहे. सध्या तुफैल आणि हारून यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, यूपी पोलीस त्यांच्या संपर्कात असलेल्या महिलांची ओळख पटवण्याचा आणि कोणत्या जिल्ह्यांतील महिला यात सामील आहेत हे तपासण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर