शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : लोक मास्क लावण्यास का टाळाटाळ करतात? 'ही' आहेत तीन कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 10:02 IST

Coronavirus : मास्क न लावण्याची तीन कारणे लोकांकडून सांगण्यात आली आहेत. ही कारणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एका सर्वेक्षणातून समोर आली आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) तिसर्‍या लाटेची चर्चा आहे. 4 जुलैला कोरोनाची तिसऱ्या लाट ठोठावल्याचा दावा, गेल्या सोमवारी एका नामांकित भौतिकशास्त्रज्ञाने असा दावाही केला होता. दरम्यान, सरकारने याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र, सरकार सतत सांगत आहे की, लोकांनी अजूनही कोरोना अॅप्रोप्रिएट बिव्हेवियर ठेवावे. असे न केल्यास कोरोना विरोधातील लढ्यात आतापर्यंत मिळविलेले यश वाया जाईल. कोरोना पुन्हा रोखण्यासाठी, मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालण करणे आणि सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे.

दरम्यान, सरकारकडून कोरोना नियमांचे पालन करण्यात सांगण्यात आले असले तरीही काही लोक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. लोक मास्क लावण्यास टाळाटाळ करतात. विशेष म्हणजे, मास्क न लावण्याची तीन कारणे लोकांकडून सांगण्यात आली आहेत. ही कारणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहेत.

'ही' आहेत कारणे...1) लोकांचे मास्क न लावण्याचे पहिले कारण श्वास घेण्यास त्रास होतो. सर्वेक्षणात सामील झालेल्या लोकांचे म्हणणे आहे की, मास्क लावण्यानंतर त्यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. त्यामुळे ते मास्क लावत नाहीत.2) लोकांचे मास्क न लावण्याचे दुसरे कारण अस्वस्थतेशी संबंधित आहे. मास्क लावल्यामुळे त्यांना 'अस्वस्थ' किंवा 'अनकम्‍फर्टेबल' वाटते. मास्क लावल्यानंतर आराम वाटत नाही.3) तिसरे कारण म्हणजे बऱ्याच लोकांनी मास्क वापरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. कारण ते सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करतात. त्यामुळे त्यांना मास्क लावण्याची जास्त गरज वाटत नाही.

सरकारची चिंता वाढलीआरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा इशारा लोक गांभीर्याने घेत नाहीत. मंत्रालय वारंवार सांगत आहे की कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले नाही तर तिसरी लाट येऊ शकते. कोरोनावरील निर्बंध कमी केल्यानंतर बाजारपेठ आणि हिलस्टेशन्सवरील लोकांची गर्दी पाहून सरकारची चिंता वाढली आहे. अशा ठिकाणी लोक सोशल डिस्टंसिंगचे पालन करत नाहीत किंवा मास्क लावत नाहीत. जर लोकांचे वागणे असेच राहिले तर निर्बंधामध्ये दिलेली शिथिलता मागे घेतली जाईल, असे सरकारने म्हटले आहे.

कांवड यात्रा रद्दकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने कांवड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लाखोंच्या गर्दीत कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करणे अशक्य आहे. कांवड यात्रा सुपरप्रेडर होऊ शकते अशी भीती आहे, असे येथील राज्य सरकारने म्हटले आहे. तर यूपी सरकारने अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य