शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हनीट्रॅपची चौकशी करणारे वारंवार का बदलले जातात? इंदूर खंडपीठाचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 06:12 IST

हनीट्रॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख आणि पथकातील सदस्यांत वारंवार बदल करण्याचे कारण काय?

- मुकेश मिश्राइंदूर : हनीट्रॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख आणि पथकातील सदस्यांत वारंवार बदल करण्याचे कारण काय? अशी विचारणा करून मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने सरकारला या प्रकरणाचा चौकशी अहवाल आणि एसआयटीतील सदस्य बदलण्याचे कारण २१ आॅक्टोबरपूर्वी लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश राज्याच्या गृह सचिवांना दिले आहेत. याप्रकरणी खंडपीठ २१ आॅक्टोबर रोजी पुढील सुनावणी घेणार आहे.या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सुपूर्द करणे आणि उच्च न्यायालयाची एक समिती स्थापन करून चौकशीवर निगराणी ठेवण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका वरिष्ठ वकील अशोक चितळे, मनोहर दलाल आणि लोकेंद्र जोशी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असताना सरकार एसआयटीत वारंवार बदल का करीत आहे? सरकार आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांमार्फत मनमानीपणे चौकशी करू पाहत आहे. अधिकारी चौकशी सुरू करताच काही दिवसांत त्या अधिकाºयाला हटविले जाते, असे याचिकेत म्हटले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अलीकडेच सरकारने एसआयटीप्रमुख डॉ. संजीव शमी यांना हटवून त्यांच्या जागी राजेंद्र कुमार यांना एसआयटीचे प्रमुख केले आहे.श्वेता सूत्रधार - अमित सोनीहॅनीट्रॅपची सूत्रधार श्वेता विजय जैन आहे, असा दावा आरोपी बरखा भटनागर सोनीचे पती अमित सोनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. माझी पत्नी निर्दोष असून तिला फसविण्यात आले, असा खुलासाही केला आहे. पंधरवडा उलटल्यानंतरही हनीट्रॅप प्रकरणात रोज नवीन खळबळजनक माहिती समोर येत आहे. सोबत स्वत: निर्दोष असल्याचे सांगत पोलिसांना जबाबदार धरले जात आहे. 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपCourtन्यायालय