शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

डमी शाळा का वाढताहेत? समिती करणार अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 08:06 IST

केंद्र सरकारचे पाऊल; कोचिंग क्लासेसकडे का वळताहेत विद्यार्थी, प्रवेश परीक्षांची पारदर्शकता यांचाही अभ्यास, शिक्षणप्रणालीतील त्रुटी शोधणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील विद्यार्थ्यांचा कोचिंग क्लासेसकडे वाढलेला कल, ‘डमी शाळा’ निर्माण करण्यासाठी चाललेले प्रयत्न आणि त्यामुळे प्रवेश परीक्षांबाबत निर्माण होणारे प्रश्न या गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नऊ सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी कोचिंग सेंटर्सवरील अवलंबून राहणे कमी करण्यासाठी उपाय सुचविणार आहे.

देशातील कोचिंग संस्था गेल्या काही काळात अनेक वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, आगीच्या घटना, अपुरी सुविधा आणि शिकविण्याच्या शंकास्पद पद्धती याविषयी अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्र सरकारने ही समिती स्थापन केली. शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या शालेय शिक्षण प्रणालीतील चिकित्सक विचार, विश्लेषण करण्याची पद्धती, नावीन्याचा शोध घेण्याकडे होत असलेले दुर्लक्ष, घोकंपट्टी करून अभ्यास करण्याची लागलेली सवय या गोष्टी  बळावल्या. शिक्षणप्रणालीत जाणवत असलेल्या त्रुटींचा अभ्यास करून ही समिती उपाययोजना सुचविणार आहे.

इंजिनिअरिंग व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी तयारी करणारे असंख्य विद्यार्थी ‘डमी शाळा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाळांमध्ये प्रवेश घेतात, जेणेकरून त्यांना फक्त स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करता येईल. हे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गांना उपस्थित राहत नाहीत आणि फक्त बोर्डाच्या परीक्षेला बसतात. अशा डमी शाळांचा सुळसुळाट झाला असून, त्याला आवर घालणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे. 

काही राज्यांमध्ये स्थानिक कोट्यांतर्गत वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र ठरण्याकरिता काही विद्यार्थी डमी शाळा निवडतात. उदाहरणार्थ, दिल्लीत बारावीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांत दिल्लीसाठी राखीव जागांचा लाभ मिळतो. त्यामुळे काही विद्यार्थी दिल्लीत अशा डमी शाळांमध्ये प्रवेश घेतात. अशा शाळा शिक्षणाची हानी करतात.

स्पर्धा परीक्षांचाही आढावा- केंद्र सरकारने नेमलेली नऊ सदस्यांची समिती शालेय शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा, तसेच त्यातील पारदर्शकतेचा आढावा घेणार आहे. - या परीक्षा कोचिंग क्लासेसच्या सुळसुळाटाकरिता किती जबाबदार आहेत हेही तपासले जाणार आहे. - शालेय आणि उच्च शिक्षण पातळीवरील मूल्यांकनाच्या पद्धतींचा अभ्यास.- नामांकित शिक्षण संस्थांमधील मर्यादित प्रवेश क्षमतेमुळे विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थांकडे वळावे लागते का, याबाबतही अभ्यास केला जाणार आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा