शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कुणाचा स्ट्राइक रेट भारी? ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला प्रतिसाद निर्णायक; १७ मतदारसंघांतच माेदींच्या प्रचाराला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 10:26 IST

६६ टक्के स्ट्राइक रेट असलेल्या राहुल गांधींच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्ट्राइक रेट ४० टक्केच ठरला.

सुनील चावके -

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपपेक्षा दुप्पट जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या यशात राहुल गांधी यांच्या ऐतिहासिक ‘भारत जोडो’ यात्रेला राज्यात मिळालेला जबरदस्त प्रतिसाद निर्णायक ठरला आहे. ६६ टक्के स्ट्राइक रेट असलेल्या राहुल गांधींच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्ट्राइक रेट ४० टक्केच ठरला.

‘भारत जोडो’ यात्रेने कर्नाटकातील ४८ विधानसभा मतदारसंघांमधून मार्गक्रमण केले. त्यापैकी ३२ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेतील राहुल गांधींच्या यशाचा स्ट्राइक रेट ६६ टक्के ठरला आहे.  ‘भारत जोडो’नंतर विधानसभा निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांनी २२ मतदारसंघांतील जाहीरसभांना संबोधित केले. त्यापैकी १५ मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले, तर ७ मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. राहुल गांधी यांचा प्रचारातील यशाचा स्ट्राइक रेट ६६ टक्के ठरला आहे. 

२५ जागांवर चालली नाही पंतप्रधान माेदींची जादू -कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण ४२ जाहीरसभा झाल्या. पण त्यांच्या प्रचाराला केवळ १७ विधानसभा मतदारसंघांमध्येच यश मिळू शकले. २५ मतदारसंघांमध्ये मोदींची जादू चालू शकली नाही. त्यांच्या प्रचाराचा स्ट्राइक रेट ४० टक्केच ठरला. 

प्रियांकांचाही प्रचार प्रभावी -मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधींंचा प्रचार प्रभावी ठरला, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या तुलनेत काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांचाही प्रचार सरस ठरला. प्रियांका गांधी यांच्या २७ विधानसभा मतदारसंघांमध्ये जाहीरसभा झाल्या. त्यापैकी १० विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळविला, तर १७ मतदारसंघांमध्ये पराभव झाला. त्यांचा स्ट्राइक रेट ३७ टक्के ठरला.

अमित शाह अपयशी -अमित शाह यांनी ३० विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार केला. पण, त्यापैकी १० मतदारसंघांमध्येच भाजपचे उमेदवार विजय मिळवू शकले. २० मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार पराभूत झाले. अमित शाह यांचा स्ट्राइक रेट अवघा ३३ टक्केच ठरला. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाहPriyanka Chopraप्रियंका चोप्रा