शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘आप’ कुणाच्या बाजूला? अद्याप भूमिका ठरली नाही : खासदार संजय सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 09:42 IST

राष्ट्रपतिपदासाठी येत्या सोमवारला विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु अद्यापही आपने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

सुरेश भुसारी -

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) कुणाला मतदान करणार, हे अद्यापही स्पष्ट न झाल्याने आप पक्षाचे लोकप्रतिनिधी या महत्त्वपूर्ण निवडणुकीत कुणाच्या पारड्यात मते टाकतील की तटस्थ राहतील, हे स्पष्ट झालेले नाही. आपचे खासदार संजय सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर आप विरोधकांच्या उमेदवाराला पाठिंबा देईल, असे बोलले जात होते. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या १५ जूनला बोलाविलेल्या विरोधकांच्या बैठकीला आपचा प्रतिनिधी राहिला नव्हता. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत आम आदमी पार्टीची भूमिका अद्याप ठरलेली नसल्याचे आपचे खासदार संजय सिंह यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सध्या आपचा लोकसभेत एकही सदस्य नाही. राज्यसभेत १० सदस्य तर १५६ आमदार आहेत.

आपशी चर्चा करणार : सुधींद्र कुलकर्णीराष्ट्रपतिपदासाठी येत्या सोमवारला विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु अद्यापही आपने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यासंदर्भात यशवंत सिन्हा यांचे निवडणूक प्रतिनिधी सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, आप नेत्यांशी लवकरच चर्चा करणार  आहे. 

बसपचा पाठिंबा -भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना बसपने पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितले की, आमच्या चळवळीचा प्रमुख भाग असलेल्या आदिवासी समाजातून मुर्मू आलेल्या असल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. हा निर्णय आम्ही भाजप, एनडीएच्या समर्थनार्थ किंवा यूपीएच्या विरोधासाठी घेतलेला नाही. तर आमचा पक्ष आणि चळवळ लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षElectionनिवडणूक